निर्गुण स्वरूपात स्वामी सागरानंद सरस्वती महाराजांचा सहवास – सुरेंद्रगिरी महाराज

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज सर्व व्यापक होते. त्यांच्याकडे ज्ञानाचा अफाट संचय होता. त्रंबकनगरीत सगुण रूपाने त्यांचा अनेकांना सहवास लाभला. मात्र, ते आपल्यात निर्गुण रूपाने आहेत. जीवदशा सोडुन प्रत्येकाने ब्रम्हदशा जाणावी असे प्रतिपादन महामंडलेश्वर सुरेंद्रगिरी महाराज यांनी केले.

तपोनिधी आनंद आखाडा पंचायतीचे अध्यक्ष, त्रंबकेश्वरचे ब्रम्हलिन सागरानंद सरस्वती महाराज समाधी उत्सर्ग व नर्मदेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच श्री १००८ महंत शंकरानंद सरस्वती महाराज, श्री १००८ महंत गणेशानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गजलक्ष्मी माता मंदिर त्रंबकेश्वर येथे संपन्न झाला.

महामंडलेश्वर सुरेंद्रगिरी महाराज पुढे म्हणाले की, गुरू शिष्य भेदाभेद त्यांच्या ठायी कधीच नव्हता. संपुर्ण भारतभर सिंहस्थ कुंभमेळयाचे यशस्वी आयोजनात त्यांचा सिहांचा वाटा असायचा. सागरानंद स्वामी यांच्यामुळेच आपल्याला महामंडलेश्वरपदी काम करण्याची संधी मिळाली. भक्तांच्या प्रत्येक समस्या दुर करण्यात ते वाकबगार होते. करूणा, आदरयुक्त भाव, ज्ञानसंचय स्वभावगुणाने ते सर्वपरिचित होते. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये स्वामी सागरानंद सरस्वती महाराजाची निश्चितच उणीव भासेल असे जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले. 

या कार्यक्रमास आमदार हिरामण खोसकर, काका महाराज इंगळे (इगतपुरी, तहसिलदार श्वेता संचेती, पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे, मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके, प्रविण अडसरे (त्रंबकेश्वर), रामेश्वर सोनी (मुंबई), मनोहर शिनगारे (जालना), कौशिक जोशी (मुंबई), राहुल जोशी (मुंबई), वैकुंठ विश्वनाथ घूगे (नाशिक), यांच्यासह भक्तीधाम कैलास मठाचे महामंडलेश्वर सविंधानंद सरस्वती, श्रीराम शक्तीपिठाचे महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती, ह.भ.प. काका महाराज इंगळे (कल्याण), महामंडलेश्वर काशिकानंद महाराज (शिर्डी),

स्वामी सुनिलगिरी महाराज (नेवासा), राजेश्वरानंद महाराज (वैजापुर), आनंद स्वामी, देवानंदगिरी महाराज, काशिकानंद महाराज, माजी नगराध्यक्ष त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर विश्वस्थ कैलास घुले, लक्ष्मीकांत थेटे, गिरीजानंद सरस्वती महाराज, महंत सर्वानंद महाराज, महंत केशवानंद, विकासानंद, योगानंद, संत गजानन महाराज शेगावचे प्रमुख हरिहर पाटील, सागरानंद स्वामी मंदिराचे शिल्पकार प्रदिप सोमपुरा, भूषण अडसुरे, निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे जयंत गोसावी,

रामदासीबाबा भक्त मंडळ कोकमठाणचे शरद थोरात, रोहित थोरात, वैभव नेरकर, बाळासाहेब त्रिभुवन, यासह दहा आखाडयाचे प्रमुख साधु संत महंत, महाराष्ट्र राज्यभरातुन आलेले भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे पौरोहित्य प्रमोद माळकृष्ण गुरुजी, डॉ पंकजशास्त्री गुरुजी यांनी केले, शेवटी महामंडलेश्वर शंकरानंद सरस्वती महाराजांनी आभार मानले.