राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीने अंध कुटुंबियांना किराणा वाटप

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र यांच्या वतीने ५० अंध कुटुंबियांना दिवाळी किराणा किटचे वाटप राष्ट्रीय दृष्टीहीन संघ यांच्या वतीने व संघाचे हितचिंतक अजय तांबे, संजय गायके, संजय गांधी, विनोद कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून गेल्या आठ वर्षांपासून अंध कुटुंबीयांना दिवाळीच्या निमित्ताने किराणा किटाचे वाटप करण्यात येते. याही वर्षी समता बँकेच्या हॉल मध्ये साई वत्सल्या बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक रत्ना चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्षा सुहासनी कोयटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी सम्राट फाउंडेशन येवलाचे विनायक पाटील, आरोग्य सल्लागार श्वेता परदेशी, सुनिल आहेर आदीसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात ब्रेल लिपीचे जनक लुई सायमंड ब्रेल यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक संघाचे हितचिंतक अजय तांबे यांनी केले. यावेळी मान्यवरांचा संघाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते ५० अंध कुटुंबियांना दिवाळी किराणा किटचे वाटप करण्यात आले. 

या किराणा किट करिता समता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे, राजेश ठोळे, मंगल बोरा पुणे, हर्षल गवारे, अविनाश सातपुते, अजित शिंगी, सुनील आहेर, प्रदीप नवले, रत्ना चांदगुडे, ओंकार लकारे, स्वेता परदेशी, संजीवनी पतसंस्था, जय जनार्धन मिल्क उंदीरवाडी, अजित कविटकर, सी. ए. दत्ता खेमनार आदी दानशूर व्यक्तींनी किराणा किट करिता मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देवरे तर आभार अजय तांबे यांनी मानले.