कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ सवलती लागू होणार – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : राज्यातील ठराविक तालुके दुष्काळ यादीत समावेश झाल्यानंतर कोपरगाव मतदारसंघात मोठा असंतोष नागरिक व्यक्त करू लागले होते. त्या पार्श्वूमीवर मा.आ. स्नेहलता कोल्हे आणि कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांनी सातत्याने मागणी करून शासनाला आग्रह धरला होता. अखेर ९ नोव्हेंबर रोजी कोपरगाव मतदारसंघातील कोपरगाव, रवंदे, सूरेगाव, पोहेगावं, दहेगाव बोलका, पुणतांबा या सात मंडलांचा समावेश दुष्काळ सवलती लागू करण्याच्या दृष्टीने झाल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर कोल्हे यांनी त्या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह शासनाचे आभार मानले आहेत.

चालू हंगामात पाऊस कमी पडल्याने शेतकरी राजा संकटात होता. त्यामुळे अतिशय खडतर परिस्थिती शेती क्षेत्रावर आली होती. या वेळेस इतर तालुके दुष्काळ यादीत बसतात मात्र, कोपरगाव तालुका या दुष्काळ यादीत का नाही? यासाठी पाठपुरावा करून कोल्हे यांनी शासन स्तरावर आग्रह धरला असताना त्यावर सकारात्मक निर्णय झाला असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

मुख्यतः शेती ही पाण्याविना उजाड होते. त्यामुळे एकीकडे पाऊस नाही, तर दुसऱ्या बाजूला पाट पाणी आवर्तन नियोजन होण्यासाठी कोल्हे आग्रही होत्या. गोदावरी लाभ क्षेत्र पाणी नियोजन होण्यासाठी गोदावरी पाणी कृती समितीने लाक्षणिक उपोषण केले. त्यातही कोल्हे यांनी पाणी नियोजन आणि दुष्काळ यादीत समावेश ही मागणी लाऊन धरली होती. त्याची दखल घेतली गेल्याने आगामी काळात शेतीसह पशुधन वाचण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

माझ्या मतदारसंघात शेतकरी राजा संकटात असताना भविष्यात दुष्काळ टंचाईला सामोरे जाण्यासाठी काय उपयोजना करता येतील. या विवंचनेत आपण असताना शासनाने मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेतला त्याबद्दल शासनाचे धन्यवाद – स्नेहलता कोल्हे

दुष्काळी गावांच्या यादीत झाल्याने या गावांना जमीन महसूल घट, पिक कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बीलाच्या वसुलीत स्थगिती, शालेय व महाविद्यालयीन फी माफी होणे, अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पाण्याचे टॅकर्स आशा सवलती तातडीने लागू करण्यात येणार आहेत.

तसेच राज्यात पशुधनाच्या चाऱ्या करीता १लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ५लाख टन मुरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार असून यासाठी लागणाऱ्या ३० कोटी रुपये खर्चासाही मान्यता आजच्या बैठकीत मान्याता देण्यात आली. असून पशुपालकांचे नूकसान होणार नाही. याची दक्षता घेण्यात येणार असल्याची दखल घेतली जाणार आहे. अशी माहिती उपलब्ध होते आहे.

कोपरगाव मतदारसंघातील कोपरगाव, रवंदे, सूरेगाव, पोहेगावं, दहेगाव बोलका, पुणतांबा ही मंडले दुष्काळ सदृश्य जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्रिमंडळाचे आणि शासन प्रशासनाचे आभार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांनी मानले आहे.