कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना व सहकार रत्न शंकरराव कोल्हे सहकारी संघ यांच्या वतीने चारा पीक बियाणे १००% अनुदानावर वितरण व महाबीज गहू आणि हरभरा बियाणे शासकीय अनुदानित दराने वितरण सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आले.
या वेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की, चारा पिके शंभर टक्के अनुदान कारखाना आणि शेतकरी संघाने व शासकीय अनुदान हरभरा बियाणे २५ रुपये आणि गहू बियाणे १६ रुपये प्रती किलो देण्याचा हा उपक्रम शेतकरी हितासाठी राबविला आहे. दुष्काळी परीस्थिती असताना शेती नियोजनबध्द पद्धतीने करने गरजेचे आहे. पाणी नियोजन आणि दर्जेदार बियाणे याचा समतोल राखून शेतकरी हित जोपासण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
सहकार टिकवणे आणि सलग्न संस्था पुन्हा उर्जित अवस्थेत आणून संजीवनी मत्स्य सारखे माध्यमे सुरू ठेवन्यासाठी प्रयत्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांच्यामुळे देशात सहकार मंत्रालय सुरू झाले. त्यातून स्थानिक सहकार टिकणार आहे. केंद्राचे ६ हजार आणि राज्याचे ६ हजार शेतकरी सन्मान निधी मिळतो आहे. माती परीक्षण करून शेतीचे नियोजन करणे आवश्यक आहे.
शेती पूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा ३४ रुपये हमीभाव जाहीर असताना २५-२७ रुपये भाव मिळून मोडकळीस येऊ नये यासाठी पशुधनाचे दुष्काळात चारा नियोजन होण्यासाठी मदत होणार आहे. पाण्याशिवाय शेती उजाड असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर लक्ष तोच आमचा पक्ष या भावनेने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आपण दोन रब्बी आणि दोन उन्हाळी आवर्तन मागणी केली होती.
दोन रब्बीचे आवर्तन मंजूर झाले असून पहिले आवर्तन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन दिलासा मिळेल. तसेच पुढे उन्हाळी आवर्तन देखील अधिक मिळावेत यासाठीही आपण आग्रही असणार आहोत. जागतिक स्पर्धेत टाकाऊ गोष्टी देखील आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे मूल्य देणाऱ्या आहेत. कोट्यावधी रुपये भागभांडवल असणाऱ्या संस्था भविष्यात आपल्या शेतकरी बांधवांसोबत काम करण्यासाठी आपण समन्वय साधणार आहोत.
सहकारातून समृद्धीकडे हा मंत्र स्व.कोल्हे साहेबांनी जपला. शेतकरी हित केंद्र बिंदू मानून निर्णय घेतले त्याच धर्तीवर शेतकरी संघ आगामी काळात देखील नावीन्यपूर्ण योजना शेतकरी बांधवांसाठी राबवणार असल्याचे शेवटी विवेक कोल्हे म्हणाले. यावेळी मंडल कृषी अधिकारी राजेश तुंभारे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. उत्तम चरमळ, जालिंदर चव्हाण, माजी सभापती सुनील देवकर, प्रकाश सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी शरदनाना थोरात, कोल्हे कारखाना उपाध्यक्ष मनेष गाडे, शेतकरी संघांचे चेअरमन अंबादास देवकर, व्हा.चेअरमन बाजीराव मांजरे, त्र्यंबक सरोदे, नानासाहेब थोरात, बाळासाहेब वक्ते, विलास वाबळे, रमेश घोडराव, राजेंद्र कोळपे, बाळासाहेब पानगव्हाणे, अशोक शिंदे, नवनाथ पवार, निलेश देवकर, भिवराज जावळे, संभाजी गावंड, विलास कुलकर्णी, बबन निकम, प्रदीप चांदर, रामजी शिंदे, ज्ञानेश्वर होन, भागिनाथ लोंढे, हिरामण गायकवाड, व्यवस्थापक हरिभाऊ गोरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.