सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीला काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेवगाव येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये ५७ किलो वजन गटात अविनाश दत्तू कोळपे या विद्यार्थ्यांची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ६१ किलो वजन गटात प्रसाद नाना कोळपे या विद्यार्थ्याची आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.    

हे दोन्ही खेळाडू दि.२२ नोव्हेंबर २०२३ रोजी कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात होणाऱ्या विभागीय स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.राजेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आमदार अशोकराव  काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव चैताली काळे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष व सर्व विश्वस्त, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.