शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ : येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या न्यायमूर्ती रानडे सभागृहात पार पडलेल्या ‘नमो चषक २०२४’ वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटातून आदिनाथ नगर येथील दादा राजळे महाविद्यालयाचे सिद्धी विजयकुमार बाफना हिने प्रथम, ढोरजळगाव येथील त्रिमूर्ती ज्युनिअर कॉलेजची पायल पांडुरंग वांडेकर हिने द्वितीय तर शेवगावच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चा निखिल राजेंद्र बोडखे याने तृतीय क्रमांक पटकावले.
इयत्ता नववी ते बारावी वयोगटातून तालुक्यातील बालमटाकळी येथील पार्थ पब्लिक स्कूलची श्रुतिका धर्मराज शेंडे हिने प्रथम, शेवगाव येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलची अमृता बंडू लव्हाट हिने द्वितीय तर आबासाहेब काकडे विद्यालयाची ज्ञानेश्वरी महारुद्र झिरपे व शेवगाव रेसिडेन्शियल हायस्कूलची अमृता महादेव पवार यांनी विभागून तृतीय क्रमांक मिळाले.
इयत्ता पाचवी ते आठवी वयोगटातून पिंगेवाडी प्राथमिक शाळेची पूजा तुळशीराम पवार हिने प्रथम, रेसिडेन्शिअल हायस्कूलचा ओंकार विक्रम दारकुंडे याने द्वितीय तर भारदे हायस्कूलची वैष्णवी दादासाहेब देवडे हिने तृतीय त्याचबरोबर इयत्ता पहिली ते चौथी या लहान गटातून जिल्हा परिषद शाळा बोधेगाव येथील अर्णव अभिमन्यू शिरसाट याने प्रथम, शेवगाव जिल्हा परिषद शाळेची उपासना किरण काथवटे व बोधेगाव प्राथमिक शाळेची वैशाली दिगंबर भवार यांना विभागून द्वितीय तर मजले शहर शाळेच्या भक्ती अशोक लोढे हिने तृतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या गटातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटेकर भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, सेवानिवृत्त प्रा. बाबासाहेब फलके, बी. डी. शिंदे, डॉ. नीरज लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. नितीन फुंदे, अमोल घोलप, कैलास सोनवणे, संदीप खरड यांच्यासह वाचक प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. नितीन दहिवाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. निलेश मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. दादा मरकड यांनी आभार मानले.