कोल्हे साखर कारखाण्याच्या मयत सभासद् वारसास पाच लाख रूपयांचा विमा प्रदान – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : तालुक्यातील पोहेगाव येथील कै. संजय बाबुराव देशमुख यांच्या वारस पत्नी श्रीमती बेबीता संजय देशमुख यांना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्यावतीने उतरवलेल्या जनता अपघाती विमा योजनेचा पाच लाख रूपयांचा विमा धनादेश कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान करण्यांत आला. 

विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, विमा ही काळाची गरज आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी कारखान्याचे सर्व सभासद व कामगारांसाठी न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडून जनता अपघात विमा योजना उतरविलेली आहे. अडचणीच्या काळात त्याचा मोठा आधार ठरला आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दूरदर्शी विचारांचा वारसा घेऊन आपण मार्गक्रमण करत आहोत.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीच्या ३२८ विमाधारकांना आजवर ६८ लाख ३७ हजार रूपयांची मदत यातुन करण्यांत आली आहे. कै. संजय बाबुराव देशमुख हे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे कर्मचारी व साखर कामगार पतपेढीचे सभासद होते. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यु झाल्याने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता पतपेढीच्यावतीने करण्यांत आली त्यांच्या वारस पत्नी बेबीताई देशमुख यांना पाच लाख रूपयांचा धनादेश मिळवून देण्यांत आला. 

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक विश्वास महाले, त्रंबक सरोदे, रमेश घोडेराव, रमेश आभाळे, राजेंद्र कोळपे, बापूसाहेब बारहाते, शिवाजी वक्ते, संजय औताडे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, पतपेढीचे अध्यक्ष साईनाथ तिपायले, संचालक देवराम देवकर, विलास कहांडळ आदि उपस्थित होते. शेवटी व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी आभार मानले.