महाराजांना फुलानी सजविलेल्या रथातून भव्य यात्रा काढून आयोध्येसाठी निरोप

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ :  श्रीक्षेत्र आयोध्येत होणाऱ्या ऐतिहासिक अशा श्री प्रभूरामचंद्र मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी विशेष निमंत्रित असलेल्या आखेगाव येथील श्रीजोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजूर्के व श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांची शेवगावकरांनी गुरुवारी शहरातून फुलानी सजविलेल्या रथातून भव्य शोभा यात्रा काढून त्यांना निरोप दिला.

Mypage

यावेळी फटाके तोफांच्या आतषबाजी व जयजय श्री रामाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. तर कार सेवकांच्या टोप्या व राम भक्ताच्या भगव्या ध्वजांनी संपूर्ण शहर भगवे झाले होते. यावेळी मिरवणुकीच्या अग्रभागी ठिकठिकाणच्या भक्ती पीठातील स्वयंसेवक भगवा ध्वज घेऊन दुचाकी रॅलीत सहभागी झाले होते. त्यानंतर अक्षदा रथ व संत मंडळीचा रथ होता.

tml> Mypage

श्री प्रभूरामचंद्र जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने परिसरातील झिंजूर्के महाराज व आदिनाथ शास्त्री महाराज तसेच श्री क्षेत्र वरुर येथील रामायणाचार्य दिनकर महाराज आंचवले यांना विशेष निमंत्रण मिळाले आहे. प्रकृति स्वास्थमुळे आंचवले महाराज यावेळी उपस्थित नव्हते. शहरातील खालची वेस परिसरातील श्री मारुतीरायाच्या मंदिरात माजी जि.प सदस्या हर्षदा काकडे यांनी संतपूजन केले, श्रीमारुतीरायाचे दर्शन घेऊन मिरवणुक बाजार पेठेतून संथ गतीने सरकत होती.

Mypage

हा मार्ग महिलांनी सडा रांगोळ्या काढून सुशोभित केला होता. अनेक ठिकाणी महाराजांचा सन्मान करण्यात आले. या मार्गातील श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती चौकातील पावन गणपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गाडगे बाबा यांना अभिवादन करुन या संत महतांनी श्रीक्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानतील श्री आईसाहेबांचे दर्शन घेतले.

Mypage

त्यानंतर ते आयोध्येसाठी मार्गस्थ झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आ. मोनिका राजळे यांनी संतपूजन करून त्यांना निरोप दिला. तर रेणुका माता देवस्थानात रेणुका परिवाराने त्यांचे पूजन करून गौरव केला. 

Mypage