पराग कुलकर्णी यांचे निधन

शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ : शेवगाव येथील रहिवासी, लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सिनियर डिस्टिलरी केमिस्ट पराग सुधाकर कुलकर्णी (वय ५८) यांचे  हृदयविकाराने निधन झाले.

कै.कुलकर्णी हे १९८५ पासून ज्ञानेश्वर साखर कारखाना डिस्टिलरी विभागात केमिस्ट पदावर कार्यरत होते. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी गावाजवळ रस्ता अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यावर त्यांनी यशस्वीपणे मात केली होती. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली, जावई असा परीवार आहे.

बाळासाहेब भारदे हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य एस.व्ही. कुलकर्णी यांचे ते कनिष्ठ चिरंजीव तर ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक, ज्येष्ठ कम्यूनिस्ट नेते कॉ. शशिकांत कुलकर्णी यांचे ते पुतणे होते.