कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये राबविले जातात. त्यात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. चालू वर्षी येसगाव केंद्राच्या स्पर्धा जिल्हा परिषद शाळा येसगाव येथे तर कोपरगाव तालुकास्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद शाळा बहादरपूर येथे नुकत्याच संपन्न झाल्या.
त्या स्पर्धेत जि प शाळा भास्कर वस्ती शाळेने केंद्र स्पर्धेत एकूण दहा बक्षिस मिळवले तर तालुकास्तरीय स्पर्धेत वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक, वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तर संपूर्ण प्रेक्षकांना अतिशय आवडलेला आणि सर्वांपेक्षा वेगळा विषय सादर करणाऱ्या जागर संविधानाच्या या भारुडाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
या भारुडात मुख्य भूमिका करणाऱ्या स्नेहल सुनील बोरगे आणि तेजस्विनी शिवाजी दिवटे यांच्या अभिनयाने सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली. तालुकास्तरीय स्पर्धेत आर्वी संतोष पाठक प्रथम क्रमांक वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत मिळवला तर दुर्वा हिने वेशभूषा सादरीकरण करण्यात प्रथम क्रमांक मिळवला. जागर संविधानाचा हे भारुड द्वितीय क्रमांक मिळवला.
केंद्रस्तरीय स्पर्धेत मोठा गट समुह गीत गायन द्वितीय क्रमांक, निशा सोमनाथ भड तृतीय क्रमांक गीत गायन स्पर्धा, स्नेहल सुनील बोरगे कथाकथन तृतीय क्रमांक, आराध्या अमोल रोहोम वेशभूषा सादरीकरण तर अद्वैत विवेक भास्कर या विद्यार्थ्याने तीन स्पर्धेत यश मिळविले गीत गायन स्पर्धेत द्वितीय हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय तर वकृत्व स्पर्धेत तृतीय असे यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य खिर्डीगणेश गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ व पालक, कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम, तालुक्याचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी साहेब, येसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संजय महानुभव, सर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक जयंत मोरे शाळेचे उपशिक्षक महेंद्र विधाते, सुकलाल महाजन आणि ज्योती टोरपे यांचे मार्गदर्शन लाभले.