शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ : नाते संबंध कसे जपावे हे आपल्याला रामायणातून शिकायला मिळते. सत्य नेहमीच जिंकत असल्याने चांगले असणे व्यक्तीच्या हिताचे आहे. प्रभू श्रीरामांनी लहानपणापासून त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या आणि त्या पेलल्या. व्यक्तीला जीवनात वेगवेगळ्या भूमिका स्वीकाराव्या लागतात. श्रीरामांचा बोध घेऊन व्यक्तीने आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या पाहिजेत. नात्याला वेळ दिला पाहिजे. असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
गणेश रांधवणे मित्र मंडळ व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शेवगाव येथील सिध्दिविनायक मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी मंदिर उद्घाटनाचा आनंदोत्सव, हळदी-कुंकू व प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या ‘सासू माझ्या प्रेमाची, सुन माझी हौसेची’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी देहाडराय होत्या याप्रसंगी वसंत हंकारे, ह.भ.प.हरि महाराज घाडगे, ह.भ.प. सोनाली काळे, ह.भ.प.संजय महाराज बिलवाल, नंदकिशोर धूत, सुनिल रासने, भारती बाहेती, अशोक आहुजा, महेश फलके, सागर फडके, शिवसेना तालुका प्रमुख (शिंदेगट) आशुतोष डहाळे वसुधा सावरकर, योगिणी पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी उत्तम देहाडराय, नितीन भाडाईत, गणेश रांधवणे या कारसेवकांचा गौरव करून सुमारे २००० महिला भगिनींना मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शिवांश कैलास डाके, स्वरा नितीन डाके यांनी श्रीराम व सीता यांची वेशभूषा सर्वांना आकर्षित करत होती.
हळदी-कुंकू कार्यक्रमाची जबाबदारी ज्योती नांगरे, चंद्रप्रभा कांबळे, शितल तुपे, संपदा शेळके, आशा बीलवाल, दिपा शेळके, शारदा वाघ, सविता भुजबळ, संगीता रायकर, अंजली भुजबळ, मंगल धोंडे, रोहिणी तारु, नंदा कदम निकिता नांगरे, रोहिणी राऊत, कल्पना नांगरे, राधा साबळे यांनी पार पाडली. विश्व हिंदू परिषदचे मुकुंद गाडेकर विजय सोनवणे, शिवाजी शेळके, नानू सोनवणे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक कुसळकर यांनी केले. गणेश रांधवणे यांनी आभार मानले.