शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : शेवगाव शहरात व तालुक्यात प्रजासत्ताक दिन ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार प्रशांत सांगडे, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे तर पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी राजेश कदम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शेवगाव न्यायालयाच्या आवारात प्रधान न्यायाधिश संजना जागुष्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सह दिवाणी न्यायाधिश व्ही. बी. डोंबे, सह न्यायाधीश एम. ए. बेंद्रे, अधिक्षक महेश जोशी, वकिल संघाचे अध्यक्ष विधिज्ञ रामदास बुधवंत, माजी अध्यक्ष के. के. गलांडे, वकिल व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली.
उपविभागीय कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, शेवगाव नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी सचिन राऊत, सार्वजनिक बांधकाम कार्यालयात उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक यांच्या हस्ते तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सभापती एकनाथ कसाळ यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपसभापती गणेश खंबरे, सर्व संचालक, सचिव अविनाश म्हस्के व व्यापारी उपस्थित होते.
विजवितरण कर्यालयात उपअभियंता अतुल लोहारे, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामेश्वर काटे, आयुर्वेद महाविद्यालयात प्राचार्य डॉ.बीटी शिंदे, न्यु आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे, आबासाहेब काकडे विद्यालयात काकडे शैक्षणिक संकूल चे अध्यक्ष ॲड शिवाजी काकडे यांचे हस्ते, माजी जिप सदस्या हर्षदा काकडे यांचे उपस्थितीत ध्वजारोहण झाले.
पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य रमेश भारदे, यांच्याहस्ते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरीश भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले.