रोटरी व रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने गरजू मुलींना सायकल वाटप

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : अनेक शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलींना पायी धडपड करीत शाळा गाठावी लागते. काहींना तर घरचे थोडे फार कामही करावे लागते. त्यामुळे त्यांचे घर ते शाळा यामधील अंतर काही मुलींच्या शैक्षणिक  प्रवाहात अडचण म्हणुन पुढे आल्याचे दिसुन आले, याची दखल घेत रोटरी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलच्या वतीने कोपरगांव मधिल जिल्हा परीषद शाळेच्या  मुलींना नुकतेच सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळालेल्या मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

रोटरी क्लबचे सहायक प्रांतपाल गौरव भुजबळ हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. कोपरगांव नगरपरीषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. तसेच रोटरी क्लबचे सदस्य व मार्गदर्शक , संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, शिर्डी  रोटरी क्लबचे अध्यक्ष रवीकिरण डाके, आदींची मुख्य उपस्थिती होती.

शाळेचे शिक्षक श्रीराम तांबे यांनी सर्वांचे स्वागत करून शाळेविषयी  माहिती देताना ते म्हणाले की, ही शाळा कोपरगांवात स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेली असुन दोन वर्षानंतर शाळा शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलचे सचिव श्री राकेश काले यांनी ‘सावित्रीच्या लेकी’ या सायकल उपक्रमाबाबत माहिती दिली. शाळा आणि घराचे अंतर हे या गरजु मुलींच्या शिक्षणात व्यत्यय ठरू नये म्हणुन छोटीसी भेट देण्यात आली असे सागीतले.

याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष श्री विरेश  अग्रवाल यांनी रोटरीची मदतीची चाके सायकलींच्या चाकांप्रमाणे पुढेच चालत राहतील. ही सायकलीची चाके मुलींना प्रगतीपथावर नेतील, असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला. तसेच आज ज्यांना सायकली मिळाल्या त्या भविष्यात  स्वावलंबी होवुन त्याही या शाळेतील  भविष्यातील  मुलींना सायकली भेट देतील, आणि रोटरीचे चक्र अबाधित ठेवतील.

क्लब ट्रेनर  डॉ. विनोद मालकर यांनी आपण या षाळेचे माजी विध्यार्थी असुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. भुजबळ यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ बध्दल माहिती दिली आणि रोटरी गरज ओळखुन गरजु व्यक्तींपर्यंत पोहचण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे करते, हेच कोपरागवं रोटरी क्लबने दाखवुन दिले असे सांगीतले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना चाकणे यांनी सांगीतले की, मुलींना सायकलीची अत्यंत आवश्यकता होती, ती गरज रोटरीने पुर्ण केली. रोटरीच्या हातुन भविष्यातही अशी  विधायक कामे व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पराडे सर यांनी आभार मानले.

या उपक्रमास माजी प्रांतपाल मोतीपावळे, प्रांतपाल रूखमेश जखोटीया, दिलीप मालपाणी यांचेही मार्गदर्शन  लाभले. तसेच या कार्यक्रमास ज्ञानदेव राहणे, नगरपालीकेचे बांधकाम अधिकारी दिपक बडगुजर, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, रोटरीचे विशाल  आढाव, अमर नरोडे, इमरान सय्यद, प्रकाश  जाधव, विशाल  मुंदडा, अविनाष निकम, देंवेंद्र कोते, सोहम कासलीवाल, साहील प्रेमानी, रोहीत गोंदकर, देवेंद्र शेळके, विध्यार्थी, पालक व शिक्षक हजर होते.