सहकार बळकटी करणासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न – बिपीनदादा कोल्हे

Mypage

कोपरगावप्रतिनिधी, दि. १८ : ग्रामीण अर्थकारणांत सहकाराचे मोठे योगदान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यापक दृष्टीकोनातून केंद्रात सहकार खाते स्वतंत्ररित्या निर्माण करत त्याची सुत्रे गृहमंत्री अमित शहा यांचेकडे दिली. सहकाराच्या बळकटीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदींचे विशेष प्रयत्न असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

Mypage

            तालुक्यातील रवंदे येथील ज्येष्ठ नेते साहेबराव कदम यांनी शिवशंकर उद्योग समुहाच्या माध्यमातून सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करून दहा व्यावसायिक गाळे बांधून त्यास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यापारी संकुल, असे नामकरण केले त्याचे लोकार्पण महाशिवरात्र पर्वकाळाच्या मुहूर्तावर बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते शनिवारी करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

Mypage

            प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष साहेबराव कदम म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागात सहकारी संस्थांना पाठबळ देत त्यांच्या समस्या जाणुन घेऊन त्याची सोडवणूक केली, त्यामुळेच सर्वत्र हे वैभव पहावयास मिळत. सहाय्यक निबंध नामदेव ठोंबळ यांनी कोपरगाव मतदारसंघातील सहकारी संस्थांचा आढावा सादर केला, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात सहकारी संस्थांना केलेल्या मदतीची माहिती तालुका विकास अधिकारी अविनाश काटे यांनी दिली.

Mypage

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले याप्रसंगी बोलताना म्हणाले की, रवंदे गाव आणि साहेबराव कदम यांनी कुशल मार्गदर्शनातून व्यवसाय निर्मितीला प्रोत्साहन देऊन सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्यापारी संकुल उभे केले हा या पंचक्रोशीचा बहुमान आहे. शिवशंकर सहकारी सोसायटीचे सचिव बाळासाहेब निमसे यांनी प्रास्तविकात संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.

Mypage

      कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे स्वतःच एक विचार होते. गरीब, दीन-दलित, वंचित, सर्वसामान्य, श्रीमंत, मध्यमवर्गीय आदी घटकांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी त्यांनी सर्व आयुष्य खर्ची घातले. सहकारमंत्री असतांना त्यांनी ग्रामीण अर्थकारणाची घडी वृद्धींगत व्हावी यासाठी पतसंस्था सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला, त्यातून हातावर प्रपंच असणाऱ्यांच्या जीवनांत आनंद निर्माण झाला. त्यांची बाजारपेठेत पत वाढविली. रवंदे गाव आणि येथील शेतकरी कष्टातून पीक उत्पादन घेतात व त्याची थेट परदेशात निर्यात करतात हा कोपरगांव मतदारसंघाचा व आपला अभिमान आहे. कमी खर्चात जादा कृषी उत्पादनाचा मुलमंत्रही माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनीच सांगितला आहे. 

Mypage

              आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक प्रथम क्रमांकाचे विचारवंत नेतृत्व आहे. त्यांनी २०१४ पासून आजपर्यंत सहकार क्षेत्रा समोर येणाऱ्या अडचणींचा अभ्यास केला. सहकारी साखर कारखानदारी आणि त्याच्या नेतृत्वाने ग्रामीण विकासाचा चेहरा मोहरा बदलला आहे, त्यासाठी अधिक पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्या म्हणून केंद्रात सहकार स्वतंत्र खाते सुरु केले. गृहमंत्री अमित शहा व त्यांचे सर्व सहकारी याला पाठबळ देत आहे, साखर कारखान्यांचा कित्येक वर्षाचा प्रलंबित आयकराचा प्रश्न मार्गी लावला असेही ते म्हणाले. 

Mypage

            याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर होन, विलासराव माळी, संजय होन, शिवाजीराव वक्ते, अशोकराव भाकरे, सरपंच भानुदास भवर, उपसरपंच संदिप कदम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाऊसाहेब कदम, बाबासाहेब कंक्राळे, निवृत्ती सोनवणे, अंबादास कदम, बाळासाहेब कदम, राधाकिसन कंक्राळे, चांगदेव लामखडे, उत्तमराव रायकर, शिवशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष शांताराम कदम, साहेबराव लामखडे, सुभाषराव कंक्राळे, नामदेव घायतडकर, सुदाम कंक्राळे, भानुदास भुसे, शिवाजी सोपान कदम, ऋषीकेश कदम,

Mypage

मच्छिंद्र लामखडे, नारायण सोनवणे, संजय सुकदेव कंक्राळे, रामदास कदम, पोपटराव भुसे, कैलास सहाणे, शिवाजीराव दवंगे, किरण उगले, डॉ. राजकुमार दवंगे, धोंडीबा सांगळे, बद्रिनाथ सांगळे, शोभाताई भवर, शोभाताई कंक्राळे, मंगल सोनवने, कांताताई मढवई, सरिताताई पवार, जिल्हा बँक रवंदा शाखेचे अधिकारी दवंगे, पाईक त्यांची सर्व सहकारी, ग्रामसेवक शिवाजीराव बागले, सोपानराव कासार, उपसरपंच भाऊसाहेब जाधव, राजेंद्र कासार, सुधाकर चंद्रे यांच्यासह विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आजी माजी संचालक, रवंदे पंचक्रोशीतील सहकारी, भाजपाचे पदाधिकारी आदि मोठ्या संख्येने उपस्थीत होतेे, शेवटी नामदेव घायतडकर यांनी आभार मानले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *