कोपरगावमध्ये भरली आजी-आजोबांची शाळा

 ८० वर्षाचे पंजोबा असलेले शिक्षक आले पुन्हा शिकवायला 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात शुक्रवारी चक्क आजी-आजोबांची शाळा भरली. नेहमीच्या शाळकरी मुलाप्रमाणे पहीली प्रार्थना झाली, श्लोक म्हणून शाळेची पहीली घंटा वाजली. ६५ वर्षापेक्षा कमी ज्यास्त असलेले आजी आजोबा वर्गात बेंचवर शिस्तित बसले इतक्यात चक्क पंजोबा झालेले ८० वर्षाचे शिक्षक वर्गात आले आणि आजी आजोबांनी एक साथ नमस्ते म्हणत गुरुजींचे स्वागत केले.

गेल्या पन्नास वर्षापुर्वी विद्यार्थीदशेत असताना पाहीलेल्या व शिकवलेल्या विद्यार्थ्यांना आज अचानक वृध्दावस्थेत ओळखणे फारच कठीण अशाही स्थितीत पंजोबा असलेल्या ८० वर्षाच्या शिक्षकांनी साद प्रतिसाद ऐकुन ओळख पटवून घेतले आणि आठवणींना उजाळा दिला. आपल्या हाताखाली शिकुन मोठमोठ्या पदावर विराजमान  होवून आता तेही सेवानिवृत्त झालेल्या विद्यार्थांनी आपल्या उतारत्या वयातही आठवणींचा स्नेहमेळावा भरवून सर्वांना भारावून टाकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

हि अजब शाळा कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात सन १९७३ साली दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या त्या वेळच्या विद्यार्थ्यांनी आज पुन्हा त्या काळातील शिक्षकासमवेत भरवली. ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व माजी विद्यार्थी रविंद्र बोरावके यांच्या पुढाकारातुन दोन दिवशीय माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्या शाळेमुळे व शिक्षण देणाऱ्या शिक्षकामुळे आपल्या जीवनाची उंची वाढली. शिक्षणाबरोबर संस्कार, संस्कृतीचे धडे ज्यांनी दिले त्यांच्या प्रति कायम आठवण असते त्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी या शाळेतील सन १९७३ च्या बॅचचे तब्बल ७५ विद्यार्थी अर्थात ६५ वर्षाचे आजी आजोबा शाळेत पुन्हा अध्यापन करण्याबरोबर गुरु पुजन करीत शाळेप्रति ऋण व्यक्त करण्यासाठी विविध ठिकाणांहून एकञ आले होते. 

त्यात १७ मुलींचा म्हणजेच आजीबाईंचा सामावेश होता. बऱ्याच वर्षांनी एकञ भेटल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. काहींना ओळख लागत नव्हती तर काहींना बघताक्षणी गळाभेट घेवून आनंद व्यक्त करीत होते. शाळकरी वयात भेटलेल्या वर्ग मिञ मैञीनींना तब्बल ५० वर्षांनी भेटून समाधान व्यक्त करीत होते.  

 शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव दिलीप अजमेरे, राजेश ठोळे, सचिन अजमेरे, संदीप अजमेरे, मुख्याध्यापक मकरंद को- हाळकर यांनी या जेष्ठ  आपल्या शाळकरी मुलांचे भरभरुन कौतुक केले. शाळेला भरीव देणगी देणाऱ्यांचा विशेष सन्मान केला. यावेळी माजी विद्यार्थी विलास सातभाई यांनी १ लाख, रविंद्र बोरावके ५१ हजार, जेठाभाई पटेल ५१ हजार, राजेंद्र बंब २१ हजार, राजेंद्र शिंगी ११ हजार, शामाताई पटेल ११ हजार, डॉ. सतिश अजमेरे ११ हजार, रामदास नरोडे ११ हजार, अरुण आहेर ११ हजार, प्रकाश देशमुख ११ हजार, संजय को- हाळकर २१ हजार, सर्व जेष्ठ माजी विद्यार्थीनींनी मिळुन १५ हजार ५१ रुपयाची देणगी शाळेला देवून आपल्या आठवणीच्या वर्गखोल्या बांधणार असल्याचे सांगितले. 

माजी विद्यार्थ्यांचा हा अनोखा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी रविंद्र बोरावके, राजेंद्र आढाव, शिरिष देशपांडे, कांतीलाल कासलीवाल, राजेंद्र शिंगी, जेठाभाई पटेल, रतन मुंदडा, माजी विद्यार्थींनी भारती अंद्रुरकर, उषा देशवंडीकर, हेमा लोणारी यांच्यासह अनेकांचे योगदान होते. या कार्यक्रमाचे सुञसंचलन सुरेश गोरे यांनी करुन उपस्थितांच्या आठवणींना अधिक उजाळा दिला. 

 आजी – आजोबा आणि नातु एकाचवेळी बसले शाळेत धडे गिरवायला.‌ आपल्या शाळेत अचानक आजोबा का आले आणि तेही आपल्यासारखे शाळेच्या मुलांप्रमाणे का वावरतात याचे आश्चर्य शाळेतील नातवांना वाटत होते.