सोमय्या महाविद्यालया गुणवत्ता हमी कक्ष विषयावर कार्यशाळा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने दि.१४ ऑगस्ट रोजी महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी अध्ययन उद्दिष्टांचे मूल्यमापन विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या उद्बोधन कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. (डॉ) व्ही. सी. ठाणगे, वाणिज्य शाखाप्रमुख प्रो. (डॉ) एस. आर. पगारे, विज्ञान शाखाप्रमुख प्रो. (डॉ) बी. बी. भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी शिक्षण हे समाज प्रबोधन व रोजगार निर्मितीचे महत्वाचे साधन असुन काळानुरूप समाजात जसजसे बदल घडत जातात तसतसे शिक्षण व्यवस्थेत सुध्दा परिवर्तन होत असतात.

नवीन शैक्षणिक धोरण हे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत निश्चितच अमुलाग्र बदल घडवुन आणतील, काळाची गरज ओळखुन महाविद्यालयाने प्राध्यापक व विद्यार्थी केंद्रित अनेक शैक्षणिक उपक्रम व ट्रेनिंग प्रोग्राम महाविद्यालयात राबविलेले आहेत. कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक डॉ. दिपक नन्नावरे यांनी दिवसभराच्या दोन्ही सत्रात नविन शैक्षणिक धोरणावर आधारित विविध विषयांचे कोर्स आउटकम्स व प्रोग्राम आउटकम्स यावर सखोल मार्गदर्शन करताना पाठ्यक्रम, शिक्षक व विद्यार्थी यामधला महत्वाचा सेतु असल्याचे नमूद केले.

पाठ्यक्रमावर आधारित आउटकम्स हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकणासाठी उपयोगी ठरत असल्याचे त्यांनी विविध प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून नमूद केले. तसेच उपस्थित प्राध्यापकांच्या शंकेचे समाधानकारक निरसनही त्यांनी यावेळी केले. उद्घाटन सत्राच्या प्रास्ताविकात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. (डॉ.) व्ही. सी. ठाणगे यांनी भारतीय शिक्षण व्यवस्था सर्वांसमोर मार्गदर्शक सिद्ध होत असून, उच्च शिक्षणात सर्वच घटकातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून रोजगाराच्या विविध संधी निर्माण करण्याच्या दृष्टिने विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

वर्तमान शिक्षण पद्धतीवर आधारित विद्यार्थीकेंद्रित आजची ही कार्यशाळा महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी ज्ञानाची पर्वणी ठरेल असे नमूद केले. या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन डॉ. गणेश चव्हाण, डॉ. संजय दवंगे, डॉ. रविंद्र जाधव, प्रा. रोहन यादव, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, संजय पाचोरे, गणेश निरगुडे यांनी केले. या कार्यशाळेसाठी वरिष्ठ महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक उपस्थित होते.