कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : १५ ऑगस्ट २०२३ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रत्येक घरात साजरा व्हावा, या दृष्टीने हर घर तिरंगा अभियान राबवले त्यास युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी साथ देऊन सभासद, शेतकऱ्यांसह, प्रत्येक कामगारांना तिरंगा झेंड्याचे वाटप केले आहे.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे, यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरात तिरंगा अभियानाबाबत जनजागृती केली., स्वातंत्र्यपूर्व चळवळीत योगदान दिलेल्या सैनिक, तसेच वीर जवानांबद्दल माहिती दिली. हर घर तिरंगासाठी महिलांनी देखील भारताचा तिरंगा झेंडा घेण्यासाठी गर्दी केली होती.
याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाळासाहेब वक्ते, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे, योगेश इंगळे, कामगार नेते मनोहर शिंदे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, ऊस व्यवस्थापक गोरखनाथ शिंदे, विवेक कुमार शुक्ला, मानव संसाधन विकास अधिकारी प्रदीप गुरव, उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, भास्कर बेलोटे, बायोगॅस विभागाचे पी. एस. अरगडे, सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व संधीला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर तिरंगा झेंड्याच्या रंगाप्रमाणे विद्युत रोषणाई करण्यात आली होती, त्यामुळे अतिशय नयन मनोहर दृश्य दिसत होते, शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.