शेवगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे सवाद्य संचालन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : विजयादशमीच्या निमित्ताने शेवगाव तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेने आज  दरवर्षीप्रमाणे शेवगाव शहरातील मुख्य बाजार पेठेतून संघाच्या वाद्यसह, खास पोषाखात भव्य असे ‘ संचालन ‘ काढुन सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

     यावेळी विजयादशमीच्या पावन अशा पर्वावर सर्व समाज बांधवांना संघ शाखेच्या वतीने जनतेला शुभेच्छा देण्यात आल्या .  संचलनात दोनशेहून अधिक बाल व तरुण संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना प्रमुख वक्त्यांनी हिंदू धर्मा समोरील दहा आव्हानांविषयी माहिती दिली. आपल्या देवी देवतांच्या हातातील शस्त्र पाहून आपल्यामध्येही शौर्याची जाणीव व्हावी असे सांगितले.

        यावेळी जिल्हा सहकार्यवाह डॉ. कृष्णा देहाडराय, तालुका कार्यवाह हरिषजी शिंदे, जिल्हा सदस्य जगदीश धुत, भाजप जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे, प्राचार्य सुधीर आपटे, प्रा. नितीन मालाणी, डॉ.निरज लांडे,  बंडूशेठ रासने, गणेश मोरे, अमोल माने, श्रीराम देहाडराय, अमित तिवारी, इत्यादी स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.