एस.जि.विद्यालयात भोंडला दांडिया उत्सव साजरा

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय मध्ये भोंडला व दांडीया उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. विदयालयांत वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. या वर्षी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी भोंडला या कार्यक्रमात विविध पोशाखात आनंद लुटला. सर्व मुलींनी विविध गीताच्या तालावर नृत्य करीत आनंद घेतला. शिक्षिकांनी पारंपरिक भोंडला गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक श्रीमती यु.एस.रायते केले. यावेळी विद्यार्थ्यांना राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थीनी विविध वेशभूषा परीधान करुन आल्या होत्या. दांडियाच्या पारंपारीक  गाण्याच्या तालावर ठेका धरत सर्वांनी दांडीया साजरा  केला. यामध्ये सर्व  विद्यार्थींनी व शिक्षिका उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. शाळेतील सर्व शिक्षिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी या उपक्रमाबद्दल सविस्तर माहीती सांगुन विदयार्थी व शिक्षिकांचे कौतुक केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड व सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भोंडला दांडियाला खुप महत्त्व आहे. जवळजवळ सर्वच ठिकाणी हा उत्सव  साजरा केला जातो  असे पर्यवेक्षिका यु.एस.रायते मॅडम यांनी सांगितले.

या प्रसंगी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, संदीप अजमेरे आदीनी सर्व विद्यार्थीनी व शिक्षिकांचे अभिनंदन केले आहे.