मुंडे बंधूच्या विरोधात गुन्हादाखल होत नसल्याने शेतकऱ्याचा उपोषणाचा ईशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील पिंगेवाडीतील वाळू प्रकरणानंतर मुंडे बंधूंच्या विरोधात शेतकऱ्यांने वारंवार तहसीलदारांना निवेदन देऊनही कारवाई झाली नाही तसेच गुन्हाही दाखल होत नसल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्याने दिला आहे.

      यासंदर्भात तालुक्यातील चेडेचांदगाव येथील शेतकरी चंद्रकांत सखाराम चेडे व त्यांचे इतर बंधूंनी, दिनांक ५ व २१ सप्टेंबर तसेच ३ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना तक्रार अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याने, त्याने ११ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.

चेडे यांनी  निवेदनात म्हटले आहे की, मी वारंवार निवेदन देऊनही अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. गट नंबर २८ मधून माझ्या जमिनीतून मुरुम चोरुन नेला आहे. आमच्या जमिनीचे उत्खनन झाल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर उत्खनन कॉन्ट्रॅक्टर अरुण भाऊसाहेब मुंडे व उदय भाऊसाहेब मुंडे या दोघांनी दमदाटी करुन जेसीबी व वाहनांच्या साहाय्याने मुरुम चोरुन नेला आहे. मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही.

दि. १७ ऑक्टोबर रोजी मंडल अधिकारी, तलाठी तसेच सार्वजनिक विभाग यांनी संयुक्त पंचनामा करून अहवाल दाखल केला असल्याचे निवेदनात म्हटले असून या संदर्भात त्वरित कारवाई झाली नाही तर पालक मंत्री तथा महसूल मंत्र्याच्या दारापुढे गुरेढोरे व बायका मुलांसह उपोषणास बसण्याचा ईशारा चंद्रकांत चेडेसह अन्य सहा शेतकर्‍यानी १८ सप्टेबर २३ ला देण्यात आला होता. तरीही अद्याप कारवाई झाली नसत्याने ३ नोव्हेबरला निवेदन देऊन ११ डिसेबरला चेडे यांनी तहसील कार्यालया समोर उपोषणास बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.