शासकीय कार्यालये थुंकण्याची नाही, तर स्वच्छ जपण्याची जागा – तहसीलदार महेश सावंत 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. 23 : बहुतांश नागरीक शासकीय कार्यालयात अथवा सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर बिनधास्त थुंकतात, कुठेही मावा, गुटखा, पान, तंबाखू खाऊन थुंकतात. शासकीय कार्यालये ही आपली अर्थात देशाची मालमत्ता आहे. आपल्या स्वत:च्या मालमत्तेची जशी आपण काळजीने स्वच्छता राखतो, आपल्या घरात आपण कुठेही घाण करत नाही, थुंकत नाही तशीच काळजी आपल्या देशाच्या मालमत्तेची अर्थात तुमच्या सार्वजनिक मालमत्तेची स्वच्छता प्रत्येक नागरीकांनी राखली पाहीजे.

परंतु काही नागरीक  शासकीय कार्यालयाची पायरी चढताना आगोदर पायरीजवळ पिचकारी मारुनच कार्यालयात प्रवेश करतात. असाच प्रवेश आपल्या घरात केला जात नाही किंवा कोणी बाहेरचा  पाहुणा आला तरी ते केलेले पटत नाही मग शासकीय कार्यालये घाण करणे म्हणजे विकृती आहे. तेव्हा शासकीय कार्यालये हि थुंकण्याची जागा नसुन ती सर्वांनी स्वच्छ ठेवून जपण्याची जागा आहे अशी प्रतिक्रिया तहसीलदार महेश सावंत यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, एक तर शासनाने इतकी मोठे कोट्यावधी रूपयांची प्रशासकीय इमारत बांधली आहे. तालुक्यासाठीचे प्रमुख शासकीय कार्यालये एकाच इमारतीत आहेत. महत्वाचे तहसील, दुय्यम निबंधक, तालुका कृषी कार्यालय, वन विभागासह इतर अनेक कार्यालय कोपरगावच्या तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत असल्याने येथे दररोज तालुक्यातुन शेकडो नागरीक शासकीय कामासाठी येतात. शासनाने या भव्य  प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतेसाठी एकहीही सफाई कर्मचारी भरलेला नाही. शौचालया पासुन ते झाडलोट करण्यापर्यंत सर्व स्वच्छतेचे काम करण्याची  समस्या कठीण आहे.

अशातच नागरी बेजबाबदारपणे वागतात, पान तंबाखू खाऊन कार्यालयाच्या आत बाहेर कुठेही कसेही थुंकुन अधिक घाण करतात. शौचालयात पाणी टाकण्याची तसदी घेतली जात नाही. शौचालयात काही बाहेरचे टुकार, बेवडे लोक येवून कशीही घाण करतात त्यामुळे  कार्यालयात दुर्गंधी पसरते. इतरांना शौचालय जाण्याची इच्छा होत नाही. बर शौचालय खराब करणाऱ्याला त्या बद्दल काहीच खंत वाटत नाही.

स्वच्छतेसाठी शासनाने कोणतीही व्यवस्था केली नाही. किंवा बाहेरच्या माणसाकडून स्वच्छता करायची झाली तरी त्यासाठी आर्थीक नियोजची व्यवस्था केली नाही. अशावेळी येथे काम करणाऱ्या संबंधीतांना काही समाजसेव व इतर लोक धारेवर धरुन जाब विचारत स्टंटबाजी करतात. पण इथे खरी जबाबदारी जितकी शासकीय कर्मचारी  व अधिकाऱ्यांची आहे तितकीच जबाबदारी नागरीकांची आहे अशी खंत तहसीलदार महेश सावंत यांनी व्यक्त केली.

प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतेसाठी आपण जिल्हा पातळीवर पाठपुरावा करीत असुन जिल्हाधिकारी  यांच्या समोर स्वच्छतेच्या गैरसोयीची माहीती दिली आहे. येथे काम  कर्मचाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याने अखेर आम्ही सर्व कर्मचारी मिळुन स्वखर्चाने तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतेसाठी  पुढाकार घेतल्याने आज येथे स्वच्छता आहे अन्यथा येथे घाणीचे साम्राज्य झाले असते असेही ते म्हणाले. 

 नागरीकांनी किमान  शासकीय कार्यालयांना आपलं कार्यालय, आपल्या घरासमान समजून स्वच्छता बाळगावी. आजही कोपरगाव तहसील कार्यालयाच्या चहुबाजूंनी लाल रंगाच्या पिचकाऱ्यांने रंगरंगोटी केल्याचे चिञ दिसते. प्रत्येक मजल्याचे कानेकोपरे थुंकुण घाण केलेत. शासकीय कार्यालयांची स्वच्छता ठेवणे  आपल्या  सर्वांची जबाबदारी आहे.

 शासनाने कोपरगाव तहसील कार्यालयाची  प्रशासकीय इमारत स्वच्छ ठेवण्या बरोबर नियमित शौचालये स्वच्छ करण्यासाठी बीओटी तत्वावर एजन्सीची नियुक्ती करणे गरजेचे आहे. केवळ स्वच्छते अभावी बाहेरून आलेल्या  नागरीकांना व महीलांना शौचालयाला जाण्याची व्यवस्था नाही. शौचालये असुन नसल्यासारखे आहे. काही बेजाबदार नागरीकांमुळे इतरांना त्याची सजा दिली जाते.  तालुक्याती अनेक महीलांची येथे शौचालया अभावी कुचंबणा होते. 

Leave a Reply