कुराश स्पर्धेत आत्मा मालिकच्या मल्लांनी केली २३ सुवर्णपदकांची कमाई

कोपरगाव प्रतिनिधी, दि. 23 : अहिल्यानगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कुराश कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिक मल्लांनी तब्बल तेवीस सुवर्णपदकांची लयलुट करीत या स्पर्धेवर आपले वर्चस्व कायम ठेवले. आणखी एका रौप्य पदकाची कमाई करीत हे मल्ल  एकूण चोवीस पदकांचे मानकरी ठरले. या सर्वांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या निमीत्ताने आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा या स्पर्धेतील दबदबा कायम राहीला.

गेल्या वीस नोव्हेंबर रोजी  क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने या जिल्हास्तरीय शालेय कुराश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे, रुद्र खिरडकर, साईराज म्हस्के,  प्रसाद खर्से, रुद्र ढोणे ,अक्षय देवगिरे, सार्थक जपे, राम वाजे, श्रीकांत कदम, शंभूराजे खोजे, यश येळे, प्रथमेश गायकवाड, कुणाल आढाव, तुषार रणसिंग, ऋषिकेश धुमाळ, साई ठाकूर, बजरंग शिंदे, रुद्राक्ष घुगे, हर्षल म्हस्के, श्रावण गायकवाड , साई काकड, ओम ठाकूर, योगेश शिंदे, श्रेयस शिंगारे , शिवमनी घुगे (रौप्यपदक) सदगुरू आत्मा मालिक माऊलींनी या सर्वांना आशीर्वाद दिले.

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या मल्लांचे मार्गदर्शक व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक व  भरत नायकल , शालेय व्यवस्थापक सुधाकर मालिक , आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक पैलवान विवेक नायकल, प्रशिक्षक  पैलवान राजू पाटील आणि  पैलवान अक्षय डांगे आदि उपस्थित होते.

आत्मा मालिक कुस्ती केंद्राच्या मल्लांनी जिल्हास्तरीय कुराश कुस्ती स्पर्धेत तब्बल २३ सुवर्णपदके पटकावली. या कुस्ती केंद्राने सातत्याने विविध कुस्ती स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. महाराष्ट्र केसरी किताब विजेते मल्ल घडवीले आहेत. – नंदकुमार सुर्यवंशी(अध्यक्ष विश्वात्मत जंगली महाराज आश्रम ट्रस्ट) ः

Leave a Reply