कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. भाई सावंत यांचे पुतणे व कोपरगाव येथील रहिवासी सोपानराव लक्ष्मणराव सावंत यांचे नुकतेच वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. कोपरगाव येथे गोदावरी काठावरील अमरधाममध्ये त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
कै. सोपानराव सावंत हे सहकार महर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यातील इलेक्ट्रीकल विभागात अनेक वर्षे सेवेत होते. मनमिळावून स्वभाव व कामातील तत्परता या गुणवैशिष्ट्यांमुळे कारखान्याच्या कामगारांमध्ये ते परिचित होते. बारा वर्षापूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
संवत्सर येथील पत्रकार शिवाजी गायकवाड यांचे ते मेहुणे होते. स्वातंत्र्य सैनिक भाई सावंत यांच्या विचारांचा वारसा त्यांना लाभलेला असल्याने त्या विचारानुसारच त्याची वाटचाल सुरु होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यशस्वी जीवन ते जगले. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.