डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या मुलींनी मारली बाजी

एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेचा शंभर टक्के निकाल

कोपरगाव प्रतिनिधी दि.२३: कोपरगाव येथील डॉ. सी एम. मेहता कन्या विद्यालयाच्या मुलींनी एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेत घवघवीत शंभर टक्के यश मिळवून तब्बल ३१ विद्यार्थीनींनी प्रथम श्रेणी अर्थात ‘ए’ ग्रेड मिळवून नवा विक्रम केला आहे. 

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्यामंदीरचा १०० टक्के निकाल लागला असुन एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत  परीक्षेत १२ विद्यार्थीनींनी ‘अ’ श्रेणी अर्थात ए ग्रेड मिळवला. ‘ब’ श्रेणीमध्ये ४ विद्यार्थिनी , ‘क’ श्रेणीमध्ये ३९ विद्यार्थिनीनी  यश मिळवले. ‘अ’ श्रेणी मिळवलेल्यामध्ये वाणी जोगेश्वरी,हंडी सबुरी,चौधरी तनुश्री, वर्मा तनुश्री, नाईकवाडे ईशा, राठोड आज्ञा, गव्हाळे सायली, नाईकवाडे निकिता, अनाड श्रेया, लोखंडे ज्ञानेश्वरी,बारहाते सबुरी, वाघ अनुजा तर  ब’ श्रेणीमध्ये लोणारी लावण्या, बारवकर स्वप्नाली,कुलकर्णी अनुष्का, बोधले अक्षदा आदींनी यश मिळवले.

तसेच रेखाकला इंटरमिजीएट परीक्षेत ‘अ’ श्रेणीमध्ये १९ विद्यार्थिनीनी यश मिळवले तर  ‘ब’ श्रेणीमध्ये ६ विद्यार्थिनी , ‘क’ श्रेणीमध्ये ११ विद्यार्थिनीनी  यश मिळवले. ‘ ए ग्रेड अर्थात अ’ श्रेणीमध्ये जंगम वैभवी, कापसे साची, कानडे रोशनी, पाळेकर जानवी, कहार आरती,  दुपारगुडे विद्या, मगर सृष्टी, कु शार्दुल वैभवी, पाठक नम्रता, पगार मयुरी, वाघ संस्कृती, पंजाबी सायली, वाल्डे श्रावणी, दवंगे साक्षी, भालेराव वेणूताई, सोनार समृद्धी, शिंदे प्राची, शिवदे मोक्षदा, जोशी आरती  आदींनी यश  मिळवून विद्यालयाच्या नावलौकीकात भर टाकली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थीनीना प्राचार्या मंजुषा सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली  कलाशिक्षक प्रवीण नीळकंठ व अमोल निर्मळ यांचे विशेष सहकार्य लाभले. यशस्वी मुलींना चिञकलेचा कोणताही अवांतर क्लास नसतानाही. दररोजची शाळा करुन शाळेतल्या कला शिक्षकाकडून शिकवलेल्या रंगकलेवर  योग्य रंगांची कला करीत चिञकलेच्या या महत्वाच्या परीक्षेत  यश संपादन केल्यामुळे यशस्वी विद्यार्थिनीचे सर्व सदस्य-स्थानिक स्कूल कमिटी, स्थानिक सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, प्राचार्या सौ. मंजुषा सुरवसे उपमुख्याध्यापक शिंदे आर.आर. पर्यवेक्षक सुरेश सोनवणे व शेख एम.ए. विद्यालयाचे  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थीनीं यांनी विशेष अभिनंदन केले.