शेवगाव प्रतिनिधी, दि १६: शेवगावमधील उचल फाउंडेशन संस्था गेल्या सहा वर्षापासून अनाथ व ऊस तोडणी कामगारांच्या मुलासाठी लोकसहभागातून करत असलेले शैक्षणिक पुनर्वसनाचे कार्य प्रेरणादायी असे आहे. संस्थेने ग्रंथालयाचा सुरू केलेला उपक्रम निवासी विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन माजी जि. प. सदस्या राणीताई लंके यांनी येथे केले.
उचल फाउंडेशनचे हितचिंतक सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील वरुर बुद्रुक येथील रहिवासी दादासाहेब शिंदे यांनी त्यांच्या आई स्व गयाबाई शिंदे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ दिलेल्या आर्थिक सहयोगातून उभारण्यात आलेल्या स्मृती ग्रंथालयाचे लोकार्पण पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी सौ. राणीताई लंके यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.
डॉ. संजय लड्डा यांनी स्वागत व प्रास्ताविक करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. डॉ. मनीषा लङ्ङा, श्रीमती. स्नेहलता लबडे, भूषण कुलकर्णी, अशोक शिंदे, दादासाहेब शिंदे, वसुधा सावरकर, नेहा दहिवळकर, दत्ता फुंदे, भागनाथ काटे, मधुकर वावरे, कानिफ म्हस्के, निलेश मोरे आदिची उपस्थिती होती. मीनाक्षी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन खेडकर यांनी आभार मानले.