भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सर्वाधीक मतांनी निवडणुन येण्यासाठी प्रयत्न करावेत – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०३ :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार, संकल्पना आत्मसात करून सर्व युवकांना आगामी काळात जनतेप्रति सेवाभाव ठेऊन युवकांनी पक्षाचे कार्य करावे, नव मतदारांना भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरण समजावुन सांगुन येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सर्वाधीक मतांनी निवडणुन येण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन आ राजळे यांनी केले.

भारतीय जनता युवा मोर्चा शेवगाव तालुका आयोजीत युवासंवाद कार्यक्रम अंतर्गत ‘कॉपी विथ यूथ’ च्या माध्यमातून तालुक्यातील युवकांशी आमदार मोनिका राजळे यांनी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या, मोदीच्या नेतृत्वाखाली विकसीत भारताची निर्मीती होत असुन महिला, शेतकरी, मजुर, कामगार आदींचे जीवनमान उंचवण्यासाठी भाजपा काम करत आहे.

३७०  कलम रद्द करून दहशतवादाच्या विळख्यातून काश्मिरला बाहेर काढत भारताचा अविभाज्य घटक बनवला. किसान सन्मान निधी, जल जीवन मिशनने प्रत्येकाच्या घरात पाणी पोहचवणे, सौभाग्य योजना, उज्वला गॅस असे अनेक महत्वकांक्षी निर्णय मोदी सरकारने घेतले आहे. विकसीत भारताचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाच्या उमेदवाराला निवडणुन देण्यासाठी युवकांना प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपण योगदान द्यावे.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश फलके, भाजपा शहराध्यक्ष बापु धनवडे, नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, संदिप खरड, महादेव पाटेकर, विनोद शिंदे, सागर सागडे, आंबादास ढाकणे, नारायण मडके, सचिन वाघ, संदिप पातकळ, विष्णु घनवट, बाबा सावळकर, आकाश साबळे, किरण काथवटे, अमोल माने, अमोल घोलप, सोमनाथ मडके, गोकुळ व्यवहारे अनिल सुपेकर, श्रीकांत लबडे, नवनाथ अमृत सुधीर जायभाये आदी भाजयुमोच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.