माजी.आमदार घुले यांची बैठक झाली रद्द

शेवगाव प्रतिनिधी, दि.०३ : लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत निघालेली स्वाभिमान जनसंवाद यात्रा मंगळवारी दुपारी शेवगाव शहरात पोहचली. या जनसंवाद यात्रेचे तालुक्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व युवकवर्गाने जल्लोषात स्वागत केले. यावेळी आ. लंके यांनी राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस ॲड प्रताप ढाकणे यांचे समवेत समर्थक कार्यकर्त्यां सह शहरातील भारस्कर वाडी विद्यानगर, इंदिरानगर, मुख्य बाजार पेठ भगतसिंग चौक, तसेच आरेकर वस्ती लांडेवस्ती आदि वाडया वस्त्यावरील नागरिकाच्या पायी फिरून भेटी घेतल्या.

नागरिकांनी विशेषतः महिला भगिनीनी पिण्याचे पाणी, आंतर्गत रस्ते, बेरोजगारी आदि मुलभूत समस्यांकडे लक्ष वेधून विविध तक्रारीचा पाढा वाचला.
यावेळी आ. लंके यांनी पिण्याचे पाणी व रेंगाळलेले  मुलभूत विकासाचे प्रश्न हा तर आपला निवडणुक अजिंठा असल्याचे सांगून निवडणूक निकाला नंतर  शेवगावच्या रेंगाळलेली व अत्यंत जिव्हाळयाची पाणी योजना प्रत्यक्ष साईटवर उभे राहून पूर्ण करू अशी ग्वाही देत त्यांनी गट विकास अधिकारी राजेश कदम यांचेसी मोबाईल वर संपर्क करून योजना कशात अडकली हे समजू घेतले.

तसेच बेरोजगारी रोखण्या साठी प्रत्येक ताकुक्यात औद्योगिक वसाहतीच्या प्रस्तावास मंजूरी मिळवून बेरोजगारांना न्याय मिळावा यासाठी आपले प्राधान्य राहील असेही ते म्हणाले, यावेळी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या शरदश्चंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष हरिष भारदे, कार्याध्यक्ष माधव काटे, एजाज काझी, राहूल मगरे, सोमा मोहिते, राहूल वरे, छबू मंडलिक, प्रवीण भारस्कर, बाळासाहेब डाके, राजेंद्र दौड, तात्यासाहेब लांडे, ज्येष्ठ नेते वसंतराव लांडे, रामदास गोल्हार, एकनाथ कुसळकर, भारत लोहकरे कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष समद काझी, प्रकाश तुजारे आदिसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आ.लंके यांच्या विषयी नागरिकात विशेषतः युवकवर्गात मोठे आकर्षण असल्याने ठिकठिकाणी त्यांचे व जनसंवाद यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शहरातील डॉक्टर, वकिल, व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांच्या त्यांनी भेटी घेऊन त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या संध्याकाळी उशिरा त्यांचा ताफा तालुक्याच्या पूर्व भागातील चापडगाव बोधेगाव कडे मार्गस्थ झाला.

अखेर मा.आ.घुले यांची बैठक झाली रद्द कारण गुलदस्त्यात – काल सोमवारी सायंकाळी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी वडुले रस्त्यावरील एका मंगलकार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांची तातडीच बैठक घेण्याचे नियोजन केले. सध्याच्या निवडणुकीच्या काळात ऐनवेळी हातो. हाती निरोप पाठवून कार्यकर्त्यांना पाचारण केल्याने आपला नेता आता काही तरी ठोस भूमिका जाहीर करणार या अपेक्षेने कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने त्या मंगल कार्यालयाची वाट धरली. भाऊचे नियोजन म्हटल्यावर सायंकाळच्या जेवणास वाट पाहू नका. असा कारभारणीला सांगावा धाडून कार्यकर्ता असेल तेथून तसाच निघाला. मात्र, कुठे माशी शिंकली हे कळले नाही. आण तेवढयाच तातडीने बैठक रद्द झाल्याचे संदेश देण्यात आले. अखेर बैठक झालीच नाही. तीचे कारण मात्र, गुलदस्त्यात राहिले ! त्याच्या तर्कवितर्काच्या चर्चाना मात्र सध्या येथे ऊत आला आहे.