तीन हजार विद्यार्थ्यांची पत्राद्वारे पालकांना मतदान करण्याची विनंती

शेवगाव प्रतिनिधी, दि.०३ :  मतदान हा संविधानाने नागरिकांना दिलेल्या सर्वोच्च हक्कापैकी महत्वाचा हक्क आहे. या हक्काप्रती नागरिकांना जागृत करण्यासाठी राबविण्यात येत असलेला उपक्रम येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये राबवण्यात आला. जिल्हाधिकारी मतदान जागृती संदर्भात जिल्हयातील विविध शाळा-महावि‌द्यालयांना केलेल्या आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद देत रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विद्यालयाच्या परिपाठामध्ये सोमवारी (दि.१) ‘मै भारत हू, हम है भारत के मतदाता’ तसेच मंगळवारी- ‘ये पुढे- मतदान कर’ या गीताचे गायन करण्यात आले. आणि बुधवारी विद्यालयातील तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पालकांना पत्र लिहून मतदान करण्याचे आवाहन केले.
       
या जनजागृतीसाठी विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड उपप्राचार्य लक्ष्मण, पर्यवेक्षक देविदास सोनटक्के यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या उपक्रमांमध्ये सर्व शिक्षक बंधू-भगिनी उस्फूर्तपणे सहभागी झाले. या अंतर्गत तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पालकांना पत्रे लिहिली आहेत.

लोकसभा मतदार जनजागृतीसाठी विद्यालयात एक एप्रिल ते तीन एप्रिल या कालावधीमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या जनजागृतीसाठी विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड उपप्राचार्य लक्ष्मण सोळसे, पर्यवेक्षक देविदास सोनटक्के यांनी  मोलाचे योगदान दिले. या उपक्रमांमध्ये सर्व शिक्षक, बंधू-भगिनी उस्फूर्तपणे सहभागी झाले.