शेवगाव प्रतिनिधी, दि.९ : तालुक्यातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याचा विद्युत पुरवठा खंडित करू नये अशी मागणी तहसीलदार प्रशांत सांगडे यांचे कडे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सभापती क्षितिज घुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी एका लेखी निवेदनादरे सोमवारी (दि. ९) केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडी जलाशयात या भागातील शेतकऱ्याचे शेती व पिण्याचे पाणी अग्रहक्काने राखीव आहे. तालुक्यातील हजारो एकर जमीन जायकवाडीच्या निर्मितीसाठी नाममात्र दराने देण्यात आली. म्हणून शासनाने येथील शेतीसाठी व जनतेसाठी साडेतीन टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचा दंडक केला आहे.
आता परिसरात तीव्र उन्हाळा असून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्या पाण्यासाठी नियमित विद्युत पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, या भागात वीजेचा सातत्याने लंपडाव चालू असल्याने शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत. तरी या परिसरातील विद्युत पुरवण सुरळीत करावा. अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
या वेळी धरणग्रस्त कृती समितीचे काकासाहेब नरवडे, मिलिंद कुलकर्णी, गणेश खंबरे, बाळासाहेब मरकड, काकासाहेब घुले, अरुण लांडे, पंडित भोसले, ॲड अनिल मडके, पंडित गायके, भारत मोटकर, बबनराव भुसारी आदि उपस्थित होते.