‘चला गणपती बनवू या’ उपक्रमास बाळ गोपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ :  आगामी गणेशोत्सवाच्या पाशर्वभूमिवर शेवगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक महेश फलके यांच्या संकल्पनेतून लोकनेते स्व. राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने स्वराज्य मंगल कार्यालयात बुधवारी पार पडलेत्या पर्यावरण पूरक शाडू  मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत  शहराच्या विविध प्राथमिक शाळा व माध्यामिक विद्यालयातील इयता पहिली ते दहावीच्या विद्यार्थी व महिलानी ‘ चला गणपती बनवू या ‘ या अभिनव उपक्रमाचा मनमुराद आनंद घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सव्वाशे वर बालगोपाळ व १५ महिलांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.

पाथर्डीच्या आनंद महाविद्यालयातीत कला शिक्षक शेषराव पवार यांनी श्री गणेश मुर्ती तयार करण्याचे स्वतः प्रात्यक्षिक करत धडे दिले. कार्यशाळेत प्रवेश निःशुल्क होता. शिवाय सहभागी झालेल्या स्पर्धकांना आयोजका कडून शाडूची माती उपलब्ध करून देण्यात आली. श्रीगणेशाची मूर्ती जसजशी आकाराला येत होती तसतसा स्पर्धक बाल गोपाळांच्या चेहर्‍यावरील आनंद फुलत असल्याचे चित्र दिसून आला. हर्षल दराडे, समर राजेभोसले, वेदिका मरकड, अस्मिता तिवारी, शरयु फडके या ४ वर्षाच्या चिमुकल्यासह विविध वयोगटातील मुली व महिलां कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.