अंजनापूर सोसायटीच्या उपाध्यक्षपदी दादासाहेब गव्हाणे बिनविरोध  

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी कोल्हे गटाचे दादासाहेब पुंजाहरी गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी दादासाहेब गव्हाणे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Mypage

अंजनापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नूतन उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी (१२ सप्टेंबर) संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपाध्यक्षपदी कोल्हे गटाचे दादासाहेब पुंजाहरी गव्हाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब आनंदराव गव्हाणे, संचालक अण्णासाहेब भानुदास गव्हाणे, भास्कर राजाराम गव्हाणे, सावळेराम दगडू गव्हाणे, चंद्रभान रावसाहेब गव्हाणे, सुखदेव राधू गव्हाणे, खंडू गोरक्षनाथ गव्हाणे, सविताताई चांगदेव गव्हाणे, कमलबाई भिकाजी गव्हाणे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र राहणे यांनी काम पाहिले. सोसायटीचे सचिव रामभाऊ वाकचौरे यांनी त्यांना सहाय्य केले.

Mypage

नूतन उपाध्यक्ष म्हणून दादासाहेब पुंजाहरी गव्हाणे यांची निवड जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष नानासाहेब गव्हाणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामनाथ लक्ष्मण गव्हाणे, भिकाजी महादू गव्हाणे, नारायण मोहन गव्हाणे, सोपान महादू गव्हाणे, अशोक आनंदराव गव्हाणे, दत्तू शंकर गव्हाणे, रावसाहेब त्र्यंबक गव्हाणे, दशरथ महादेव कोटकर, अर्जुन जयराम गव्हाणे, प्रल्हाद दादा गाडे, बबन दादा गव्हाणे, संभाजी साहेबराव गव्हाणे, प्रकाश विश्राम गव्हाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Mypage

माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी कोपरगाव तालुक्यात अनेक सहकारी संस्थांची स्थापना करून त्यांचे मोठे जाळे निर्माण केले. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याबरोबरच सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी अविरत प्रयत्न केले. अंजनापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर गेल्या अनेक वर्षांपासून स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या गटाचे वर्चस्व राहिलेले आहे.

Mypage

आताही ही सोसायटी कोल्हे गटाच्या ताब्यात असून, या संस्थेवर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कार्यरत आहे. या सोसायटीच्या उपाध्यक्षपदी कोल्हे गटाचे दादासाहेब पुंजाहरी गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *