श्रीगणेश शैक्षणिक संकुलाला कुस्ती स्पर्धेत १६ सुवर्ण

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ :  जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राहाता तालुका शालेय क्रीडा कुस्ती स्पर्धेत श्रीगणेश इंटरनॅशनल स्कुल व जुनिअर कॉलेज, कोऱ्हाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत १६ सुवर्ण पदके मिळविली.

  यामध्ये १४ वर्षे वयोगटात विराज पाचोरे वजन ५१ किलो, मधू चव्हाण वजन ५१ किलो, विजेता साईशा वजन ४१ किलो, झाकले साई वजन ५५ किलो, तासकर कृष्णा वजन ४७ किलो उपविजेता, समृद्धी गुंजाळ वजन उपविजेता ५७ किलो, १७ वर्षे वयोगटात सुरज व्यवहारे वजन ७४ किलो विजेता, सायली गुंजाळ वजन विजेता ४५ किलो, गणेश जाधव वजन ७१ किलो विजेता, हेमराज भुसारे वजन ५७ किलो उपविजेता,

ईश्वर डांगे वजन ४५ किलो उपविजेता, तसेच १९ वर्षे वयोगटात ओम आढाव वजन ८० किलो विजेता, मनीष अहिरे वजन ६५ किलो विजेता, धनंजय चोळके वजन ७० किलो विजेता, शुभम आम्रे वजन ५७ किलो विजेता, शुभम वाणी वजन ४५ किलो विजेता, ऋषिका भारस्कर वजन ५२ किलो विजेता अदिती डांगे वजन ५० किलो विजेता झाले आहेत. विजेता विद्यार्थी सुवर्ण पदकासाठी पात्र ठरले आहेत. हि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

          सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे,उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे,रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा,योगेश मुनावत,स्वप्निल लोढा,सुरेश गमे,आकाश छाजेड, चिराग पटेल , गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख, रामनाथ पाचोरे, पंकज खंडांगळे, पर्यवेक्षक प्रवीण चाफेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.बापू पुणेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक दिलीप दुशिंग व रविंद्र मोगल यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.