संवत्सरच्या जनता स्कूलमध्ये गणित-विज्ञान प्रदर्शन मेळावा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल मध्ये गणित विज्ञान प्रदर्शन आणि अपूर्व विज्ञान मेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला .कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर साबळे पाटील होते.

यावेळी  गणित विज्ञान प्रदर्शन व अपूर्व विज्ञान मेळावा उद्घाटन प्रमुख अतिथी  के. जे. सोमैया कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.  बापूसाहेब भोसले सर यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश मोरे सर तर  स्वागत
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री भगवान शिंदे यांनी केले. या प्रदर्शनात लहान गट आणि मोठा गट सर्वांनी मिळून 295 उपकरणे तयार करून सहभागी झाली होती.

यावर्षी विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. विज्ञान प्रदर्शन आणि अपूर्व विज्ञान मेळावा हा खूप मोठा विज्ञान मेळावा ठरलेला आहे. यावेळी  कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण केला पाहिजे याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रम प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन  बाळासाहेब  बारहाते यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षकशरद अंबिलवादे सर यांनी मानले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गुरुकुल प्रमुख खेताडे सर, वाघमारे सर बागुल सर यांनी केले, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षक शेख सर, बनसोडे सर, श्री शिंदे सर, तायडे सर, दाणे सर श्रीमती गोसावी मॅडम, श्रीमती म्हस्के मॅडम, मोरे व्ही.बी. सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.