गौतम स्कूलचा हॉकी संघ करणार जिल्ह्याचे नेतृत्व

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १४ वर्ष वयोगटातील गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने आत्मा मलिक स्कूल संघाचा ४-० असा पराभव करत विभागीय स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे सर्व विश्वस्त व गव्हर्निग कौन्सिल सदस्य यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्ष व १९ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य नुर शेख यांच्या हस्ते अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडले. यावेळी सहभागी संघ, प्रशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या सचिव व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी स्पर्धेदरम्यान उपस्थित राहून सर्व खेळाडूना उत्कृष्ट खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

       सदर स्पर्धेत १९ वर्ष व १४ वर्ष वयोगटातील मुले व मुली असे एकूण १४ संघ सहभागी झाले होते. या चुरशीच्या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने आत्मा मलिक स्कूल संघाचा ४-० असा पराभव करत विभागीय स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला आहे. विभागीय स्पर्धा ह्या दिनांक १६ डिसेंबर २०२२ ते १८ डिसेंबर २०२२ या दरम्यान गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर होणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी दिली.

       यशस्वी सर्व खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नुर शेख यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नुर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर नीलक सर, हॉकी रमेश पटारे, सोहेल शेख यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. पंच म्हणून अकबर शेख, समीर शेख यांनी काम पहिले.