शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ : आतापर्यंत गुंतवणूकदाराने वा शेअर ट्रेडिंग मार्केट व्यावसायिकापैकी कोणी ही तक्रार दाखल केली नव्हती. मात्र रविवारी येथील ज्येष्ठ शेअर ट्रेडिंग व्यावसायिक साईनाथ कवडे यांना चाकूचा धाक दाखवून ७ लाख रुपयाच्या खंडणी साठी खुनाची धमकी देणाऱ्या दोघाविरुद्ध शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणी खोरांनी कवडे यांच्या कुटुंबाला संपविण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तालुक्यातील रावतळे कुरुडगाव येथील शेती व शेअर ट्रेडिंग व्यावसायिक साईनाथ कल्याण कवडे यांनी पोलिसात काल दाखल केलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गेल्या दि.२९ फेबुवारी रोजी आपण आपल्या शेतीत काम करत असतांना महेश मच्छिंद्र जगताप रा.गेवराई ता. नेवासे व योगेश शिवाजी चावरे रा. नजिक चिंचोली यांनी चाकू दाखवून तू शेअर व्यवसायात खूप पैसा जमा केला आहे.
त्यामुळे आम्हा दोघांना ७ लाख रुपये महिना हप्ता दे, नाही तर तुझ्या विरोधात सर्व कार्यालयात अर्ज करून बदनामी करू अशी धमकी दिली. खंडणी देण्यास नकार दिल्याने आम्ही मोठे गुन्हेगार आहोत. आमच्या नादी लागू नको. तुला संपवून टाकू. असे म्हणून ते निघुन गेले. त्यानंतरही वारंवार पैशाची मागणी करून आपल्या विरोधात पोलिस अधिक्षका सह विविध ११ कार्यालयात आपल्या विरोधात अर्ज केले. १६ मार्चला आरोपी जगताप याने
पुन्हा खंडणीची मागणी करून अन्यथा तुझे कुटूंब संपवू.
कुठेही गुन्हा दाखल कर मी सर्व पोलिस मॅनेज केले आहेत. पाच वाजे पर्यंत वेळ देतो. नाहीतर तुझा खून. असा व्हाटसअपवर मेसेज दिला. १३ एप्रिल रोजी पुन्हा तुला आज शेवटचा दिवस देतो. नाही तर माझी माणसे तुझ्यावर सोडतो. तुझ्या कुटूंबाला धोका होऊ शकतो. अशी धमकी दिल्याचे तकारीत म्हटले आहे.