शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ : देशातील अग्रगण्य अशा श्री रेणुका माता मल्टीस्टेट को ऑप. क्रेडीट सोसायटीचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव हे येत्या शुक्रवार दि. २६ एप्रिल पासून महत्वपूर्ण व्यवसायाच्या दालनात प्रवेश करत आहेत.
मुंबईच्या दलाल स्ट्रीट वरील स्टॉक एक्सेज मधील चौथ्या मजल्यावर ‘श्री रेणुका माता ब्रोकरेज ‘ या त्यांच्या नव्या फर्मच्या दालनाचे मन्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन शुक्रवारी सकाळी होत आहे.
श्री रेणुका माता ब्रोकरेज या संस्थे मार्फत खातेदारांना डीमॅट खाते उघडता येणार असून खातेदार इक्विडीटी, नेप्टी, कम्युडीटी आदि व्यवहार करु शकणार आहेत.
अर्थतज्ञ डॉ. भालेराव श्री रेणुका माता मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट संस्थेच्या नऊ राज्यातील १३८ शाखांच्या दहा लाख ग्राहकांना तसेच देश विदेशातील अन्य संस्थातील सदस्यांना देत असलेल्या अत्यंत विश्वसनीय व पारदर्शी सेवे प्रमाणेच आपल्या नव्या संस्थे मार्फत ‘स्टॉक ब्रोकर’ म्हणून विश्वसनीय अशी सेवा आपल्या ग्राहकांना निश्चीत देतील अशा प्रतिक्रीया येथील आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत.