डॉ. संजय दवंगे यांची स्वयं अध्ययन साहित्य लेखन कार्यासाठी निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय कोपरगाव येथील हिंदी विभागप्रमुख डॉ. संजय दवंगे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नासिक येथील एम.ए. हिंदी शिक्षण क्रमातील अभ्यासक्रमाच्या स्वयं अध्ययन साहित्य लेखन कार्यासाठी निवड झाल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली आहे.

या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे. सध्या सर्वच विदयापीठांमध्ये नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबिले जात असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठाच्या मानव्यविदया व सामाजिक शास्त्रे विदयाशाखेमार्फत हिंदी पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम विकसित करण्यात येत आहे. डॉ. संजय दवंगे यांचा अध्ययन, अध्यापन व संशोधन क्षेत्रातील दीर्घ अनुभव व व्यासंग विचारात घेऊन त्यांची या कामी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. संजय दवंगे हे याच महाविदयालयाचे माजी विदयार्थी असून त्यांचे आतापर्यंत २४ शोधालेख मान्यताप्राप्त पत्रिकेत प्रकाशित झालेले असुन यूजीसी संस्थेअंतर्गत एक लघुशोध प्रबंध पूर्ण केलेला आहे. विदयार्थी केंद्रित अनेक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचा उत्कृष्ट विदयार्थी विकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य, शाखा कोपरगावचे कार्याध्यक्ष म्हणुनही त्यांचे साहित्यिक कार्य प्रशसनीय आहे. विदयेचे माहेरघर म्हणुन ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ हिंदी अभ्यास मंडळाचेही ते सदस्य आहेत. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविदयालयाच्या वतीने कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोक रोहमारे, सचिव ॲड. एस.डी. कुलकर्णी,  विश्वस्त मा. संदीप रोहमारे, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, सचिन धर्मापुरीकर उपसंपादक लोकमत कार्यालय कोपरगाव, पत्रकार लक्ष्मण जावळे व महाविदयालयातील शिक्षक, शिक्षकेतर-कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. संजय दवंगे यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.