बेपत्ता अल्पवयीन मुलींचा तात्काळ शोध घ्या, अन्यथा आमरण उपोषन करण्यात येईल

शेवगाव प्रतिनिधी, दि.२६ :  शेवगाव परिसरातून एका नातेवाईक तरूणाने पळवून नेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा तपास लावावा. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह मुलींच्या आई-वडील यांनी गुरुवारी अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन आपली कैफियत ऐकविली. तसेच येत्या ८ दिवसांत मुली सुरक्षित न मिळल्यास शेवगाव पोलिस ठाण्या समोर आमरण उपोषन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

खैरे यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात कॉ. संजय नांगरे, आकाश दौंडे, संध्या मेढे, फिरोज शेख, भैरवनाथ वाकळे, संतोष गायकवाड, लता बोरुडे, किशोर जाधव, उज्वला जाधव, रामदास जाधव, वनिता जाधव, अलिशा शिंदे, आशा साठे, मिरा बानाईत, सुनिता सुर्यनारायण तसेच मुलींचे आई-वडील व नातेवाईक उपस्थित होते.        

तालुक्यातील चेडे चांदगांव येथील सात दिवसांपासून बेपत्ता तीन अल्पवयीन दलित मुलींचा तात्काळ शोध घेण्यात यावा यासाठी ३० एप्रिल पासून कुटुंबीयांसह शेवगाव पोलीस ठाण्या समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन यावेळी बाबत खैरे यांना देण्यात आले.

या तीन अल्पवयीन मुलींना दुचाकीवरून पळून नेले जात असताना नातेवाईकांनी करंजीघाटात पाहिल्या नंतर एकाने मुलीच्या वडिलास फोन करून सांगितले. ही घटना शुक्रवार दि. १९ ला घडली. मुलीचे आई-वडील बीड जिल्ह्यातील मु. गुळंज ता. गेवराई येथे साखरपुड्याच्या निमित्ताने गेलेले असताना ही घटना घडली.

त्याच दिवशी शेवगाव पो. स्टे.ला तक्रार दाखल करण्यात आली. घटनेला सात दिवस होऊनही अद्याप काहीच तपास लागलेला नाही. आरोपीचे नाव देऊनती तो सापडला नाही. त्यामुळे मुलीच्या आई व वडीलांची मानसिक स्थिती खालावून गेली आहे. यावेळी खैरे यांनी गुन्हा अन्वेषण शाखेचे तपासी अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून लवकरच आरोपीसह बेपत्ता मुलींचा शोध घेऊ असे आश्वासित केले.