कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीतील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा व कोपरगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन समारंभ 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे व कमलाकर कोते यांनी दिली.
बुधवारी दुपारी दोन वाजता कृष्णाई बँन्क्वेट हॉल , छत्रपती संभाजी महाराज चौक कोपरगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे लोकार्पण होणार आहेत.
प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी,आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, परजणे पा.गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे हे प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहे.
शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय रासप व मित्र पक्षातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारासाठी व महायुती मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख नितीन औताडे व कमलाकर कोते यांनी केले आहे.