इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सुरक्षित राज्य  – न्यायाधीश  कोऱ्हाळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : “महाराष्ट्र राज्य इतर राज्याच्या तुलनेत सुरक्षित असल्याचे मत जिल्हा न्यायाधीश स .बा. कोऱ्हाळे यांनी मांडले असून कामगार दिनाच्या निमित्ताने कोपरगाव औद्योगिक वसाहत लिमिटेड  येथे तालुका विधी
सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने कामगारासाठी कायदेविषयक शिबिरामध्ये अध्यक्ष पदावरून बोलताना व्यक्त केले.

यावेळी मंचावर मुख्य न्याय दंडाधिकारी भगवान पंडित, तालुका वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ एम .पी येवले सरकारी वकील वहाडणे, सरकारी वकील ए.डी. टुपके आदि मान्यवर उपस्थित होते. न्यायाधीश कोऱ्हाळे पुढे म्हणाले
की, कर्मचाऱ्यांनी कर्तव्य हक्काने जबाबदारीचे पालन केले, तर त्या उद्योगधंद्याची संस्थेची नेहमी प्रगती होत असते म्हणून मालकाने कर्मचारी यामध्ये समन्वयाच नातं असलं पाहिजे कामगारांनी स्वतःला मालक म्हणून काम केलं पाहिजे तर मालकांनी सुद्धा स्वतः कर्मचारी असल्यासारखं काम केलं पाहिजे असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य न्याय दंडाधिकारी श्री भगवान पंडित तसेच वकील संघाचे अध्यक्ष येवले, वहाडणे तसेच ए .डी
टुपके यांनी कामगार दिनानिमित्ताने कायदेविषयक मार्गदर्शन केले. कामगार दिन साजरा करण्याचा व कामगाराचा गौरव  करण्याचा दिवस असतो त्याचा हेतू व उद्देश  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगाराविषयी दिलेले कायदे व समाजामध्ये कामगार वर्गाचे होणारे शोषण आणि त्यासंदर्भात शासन दरबारी न्याय देण्याची भूमिका शासनाची भुमिका याबद्दल स्पष्टीकरण केले.

कर्मचाऱ्यांमुळेच कोणत्याही संस्थेची उद्योगधंद्याची प्रगती असते महिला, पुरुष कामगारांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे त्यांचे न्याय हक्क अबाधित राहण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे चेअरमन केशवराव भवर, संचालक रोहित वाघ, संचालक पंडित भारुड, संचालक सागर शहा, उद्योजक नरेंद्र कुर्लेकर, आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई  कोल्हे संजीवनी उधोग समूहाचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे तसेच संस्थेचे चेअरमन विवेकदादा बिपिनदादा कोल्हे यांच्या
मार्गदशरणातून वसाहतीचा विकास होत असल्याचे केशवराव  भवर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे संचालक पंडित भारुड सर यांनी केले व आभार वसाहतीचे व्हा. चेअरमन केशवराव भवर यांनी मांडले. यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक कारखानदार कर्मचारी गाळेधारक बंधू भगिनी, वसंतराव देशमुख, चाचा चौधरी, एस एम शेळके आदि उद्योजक कर्मचारी गाळेधारक महिला उपस्थित होते