विकास निधी आणण्यात आशुतोष काळेंनी केला विक्रम – अजित पवार 

 कोपरगाव प्रतिनिधी दि. २१ : कोपरगाव विधानसभा अस्तित्वात आल्यापासून कोणीच इतका विकास निधी आणला नसेल इतका तब्बल ३ हजार कोटी विकास निधीकोपरगाव मतदार संघासाठी आणुण आमदार आशुतोष काळे यांनी विक्रम केला आहे. इतका निधी आणणं येड्या गबाळ्यांचे काम नाही असे मनोगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केले. 

माजी आमदार अशोकराव काळे यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त्याने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अभिष्टचिंतन सोहळा व आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मतदार संघासाठी तीनशे कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी खासदार डॉ. सुजय विखे, पुष्पाताई काळे, चैताली काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले, आमदार किशोर दराडे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सिध्दार्थ मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रतिक पाटील, विजय वहाडणे, पद्माकांत कुदळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन करुन माजी आमदार अशोकराव काळे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, काळे परिवारातील तीन पिढया बरोबर काम करण्याचे संधी मला मिळाली. मी स्वत:ला नशिबवान समजतो. नगर जिल्ह्याला अनेक थोर नेते लाभले त्यांपैकी स्व. शंकरराव काळे यांचे योगदान मोलाचे आहे. स्व. काळे यांच्यामुळे जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवता आला. स्व. काळे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा जपला ते अध्यक्ष असताना खऱ्या अर्थाने रयत शिक्षण संस्थेचा विस्तार झाला. स्व. काळे यांच्या विचारांचा वारसा माजी आमदार अशोकराव काळे हे पुढे घेवून जात आहेत तर आमदार आशुतोष काळे तोच वारसा जपत आहेत. आमदार काळे यांचे विकास कार्य उल्लेखनीय आहे असे म्हणत काळे परिवाराचे पवार यांनी भरभरून कौतुक केले.

 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आमदार आशुतोष काळे म्हणाले की, अजित दादांच्या सहकार्याने मतदार संघासाठी इतका मोठा निधी आणता आला. मी पहील्या पराभवाने खचुन गेलो नाही उलट पराभवास वडिलांचे आजारपण व इतर अनेक संकटे समोर असतानाही केवळ आजोबा व आईवडील यांची प्रेरणा आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आमदार झालो.  माझ्या वडिलांनी कमी वयात राजकारणातून निवृत्ती घेवून मला कमी वयात संधी दिली. आजच्या राजकारणी नेत्यामध्ये वय झाले तरीही राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा नसते पण माझ्या वडिलांनी ते केलं म्हणून मला संधी मिळाली असे म्हणत आशुतोष काळे यांनी राज्यातील जेष्ठ नेत्यांना टोला लगावला. 

 यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्यातील सत्काराला उत्तर देताना माजी आमदार अशोकराव काळे म्हणाले की, जे माझ्या पोटात असते तेच ओठात असते. जे आहे ते आहे जे नाही ते नाही असा माझा स्पष्ट स्वभाव अजितदादा पवार यांच्यासारखा आहे. स्वताच्या फायद्यासाठी मी कधीच तडजोड केली नाही.  म्हणुनच मी विरोधी पक्षाचा आमदार होतो, तरीही मला सर्वांनी विकास कामांना मदत केली.

 मी ताकाला जावून गाडगं लपवणारा नाही जरा स्पष्ट  बोलणारा आहे.  मागच्यावेळी आशुतोष काळेंना कोपरगावकरांनी काठावर पास केले अगदी ३६ टक्के. तरीही आशुतोष काळेंना मी  भरभरुन विकास निधी दिला आता तुम्हीपण यावेळी  काळेंना मिरीटवर निवडणूक द्या अर्थात लई लई मतं द्या मग मी पण लई लई निधी देतो अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना केली. 

 अजितदादा आशुतोषचा हट्ट पुर्ण करतात तसा मीही करतो. बदलत्या काळात मुलं आईवडिलांच्या कर्तव्याची जाणीव ठेवतात आशुतोष काळेंचा स्वभाव अनुकर्णीय आहे. असे म्हणत आशुतोष काळे यांच्या कार्याचा गौरव केला.   यावेळी खासदार सुजय विखे यांनी राजकीय भाष्य जपुन करीत काळे व विखेपरिवाराचे ऋणानुबंध काय ठेवण्याची जबाबदारी घेतो. तालुक्यासह जिल्यातील विविध प्रश्नांसाठी आम्ही दोन्ही परिवार एकसंघ राहु असे म्हणत माजी आमदार अशोकराव काळे यांचे अभिनंदन केले.   दरम्यान माजी आमदार अशोकराव काळे यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित हजारो हितचिंतकांनी त्यांना भरभरुन शुभेच्छा देत शुभेच्छांचा वर्षाव केला.