पारंपारिक शिक्षणाला व्यावसायिक कौश्याल्य शिक्षणाची गरज – सीए दत्तात्रय खेमनर

पारंपारिक शिक्षणाला व्यावसायिक व कौश्याल्याधीष्टीत शिक्षणाची जोड द्यावी,ही बदलत्या काळाची गरज –सीए.दत्तात्रय खेमनर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, रा.से.योजना आणि हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याय, पोहेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आझादी का अमृत महोत्सव युवकांचा  ध्यास ग्राम शहर विकास या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना सीए दत्तात्रय खेमनर यांनी शिक्षण पद्धतीत झालेल्या बदलाच्या अनुषंगाने नवीन शिक्षण पद्धतीचा विचार करताना अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पारंगत शिक्षणा बरोबरच तीन महिने, सहा महिने, वर्ष कालावधीचे नोकरीला अनुकूल असणारे व्यावसायिक आणि कौश्ल्याधीष्टीत कोर्सेस महाविद्यालयात सुरु करणे आवश्यक आहे या कोर्सेस मुळे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेलच परंतु त्याचबरोबर स्वयंरोजगार निर्माण करण्यास मदत होईल असे मत समारोप समारंभाच्या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खेमनर सर यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना अनेक प्रेरक उदाहरणे देऊन जीवनात नवीन वाट शोधण्यासाठी प्रोत्साहित केले.

कोपरगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष, ॲड.शिवाजीराव खामकर यांनी शिक्षण घेताना आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कामवा व शिका या योजनेत सहभागी होऊन स्वावलंबी बनावे असे आवहान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सैनिकी स्कूल व ज्यू.कॉलेज संजीवनीचे प्राचार्य डॉ.गोरखनाथ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी आहेत या संदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे .

डॉ.गोरखनाथ गायकवाड यांनी स्वयंसेवकांना प्रेरित आणि प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे, कोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन  केले.

रा.से.यो.चे विभाग समन्वयक प्रा.डॉ.बाळासाहेब गायकवाड यांनी रा.से योजनेमुळे शिबीर सुरु होण्यापूर्वी व शिबीर संपल्यानंतर कोणकोणते बदल होतात या संदर्भात विवेचन केले. शिबिरार्थीच्या वतीने विद्यार्थी प्रतीनिधी दीपक मुंगसे  व विद्यार्थीनी प्रतीनिधी प्रांजली खंडीझोड  या दोघांनी शिबीर काळातील सात दिवसात आलेले अनुभव व विद्यार्थांमध्ये झालेले बदल याविषयी भाष्य केले.

समारोप समारंभासाठी उपस्थित प्रमुख अतिथी सीए दत्तात्रय खेमनर, ॲड.शिवाजीराव खामकर आणि अध्यक्ष प्राचार्य गोरखनाथ गायकवाड यांचा परीचय व त्यांनी केलेले कार्य याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शांतीलाल जावळे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.रवींद्र गायकवाड यांनी केले,त्यांनी शिबिर काळातील वेस सोयगाव परिसरातील रा.से.योजनेच्या सवयंसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा दिला व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले.ग्रामस्थांच्या वातीने शरद सरवार आणि नारायण खंडीझोड यांनी सवयंसेवकांनी केलेल्या कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सस्वयंसेविका निकिता घारे हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा.निकिता सांगळे यांनी केले. निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी वेस सोयगाव ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच जयाताई माळी, उपसरपंच आनंदा भडांगे ,तलाठी दत्तात्रय वडीतके, ग्रामसेवक अमोल निकम, शकील सय्यद,विठ्ठल कुर्हाडे , प्रवीण कोल्हे, नारायण खंडीझोड, शरद सरवार, अशोक म्हळस्कर, यांच्यासह  अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. जि.प. प्राथमिक शाळा वेसचे मुख्याध्यापक अशोक शिरसाट व त्यांचा संपूर्ण सेवक वृंद उपस्थित होते, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी ,रा.से.योजना स्वयंसेवक शिक्षक, शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.