स्वच्छ पिण्याचे पाणी असेल तरच गावचा विकास होतो – भास्कर पेरे

 नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच सदस्यांची कार्यशाळा संपन्न

वाळवंट असलेल्या आखाती देशात पाच पाच वर्षे पाऊस पडत नाही. तिथे पाण्याचा पत्ता नसतानाही तब्बल १६०व्या मजल्यावर मुबलक पाणी येते. माञ आमच्याकडे दरवर्षी धो-धो पाऊस पडून गावाला पूर येतो, तरी त्याच गावांना पिण्यासाठी दररोज स्वच्छ पाणी मिळत नाही हि शोकांतीका आहे. 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : ज्या गावातील नागरीकांना स्वच्छ पिण्याचे मुबलक पाणी  मिळते त्या गावातील नागरीकांचे आरोग्य सुरक्षित राहते. पाण्यामुळे अनेक समस्या  सोडवून गावाचा खऱ्या अर्थाने विकास होतो असे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लोकप्रिय सरपंच भास्करराव पेरे यांनी व्यक्त केले. बुधवारी सायंकाळी कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष  बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते यांच्या संकल्पनेतून कोपरगाव मतदार संघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यांना ग्रामपंचायतीच्या विविध योजना व ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणाली संदर्भात विषेश मार्गदर्शन व कार्यशाळा तसेच नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक यांचा नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

    युवा नेते विवेक कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हे कारखान्याचे संचालक ञ्यंबकराव सरोदे होते. याप्रसंगी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, दत्तात्रय कोल्हे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई भाजपच्या महीला शहराध्यक्षा शिल्पा रोहमारे विद्या सोनवणे, वैशाली आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

मतदार संघातील १२२ नविन नवनिर्वाचित सदस्य व मागील पंचवार्षिक मध्ये सदस्य सरपंच असलेल्या २५७ विजय व पराभुत सदस्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळ उपस्थित गावच्या कारभाऱ्यांना मार्गदर्शन करताने भास्करराव पेरे पुढे म्हणाले की, वाळवंट असलेल्या आखाती देशात पाच पाच वर्षे पाऊस पडत नाही. तिथे पाण्याचा पत्ता नसतानाही तब्बल १६०व्या मजल्यावर मुबलक पाणी येते. माञ आमच्याकडे दरवर्षी धो-धो पाऊस पडून गावाला पूर येतो, तरी त्याच गावांना पिण्यासाठी दररोज स्वच्छ पाणी मिळत नाही हि शोकांतीका आहे. 

 प्रदुषण करून संपूर्ण देशाचे चांगले पाणी आपणच दुषित करीत आहोत. गावाच्या भल्यासाठी ग्रामस्थांनी शंभर टक्के कर भरला पाहीजे. ग्रामपंचायतीचा खर्च जनतेला समजावून सांगितला पाहीजे. ज्याला अक्कल नाही त्यांच्यासाठी शासनाचा जीआर असतो, तुमच्या गावचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. 

राजकारणाच्या पलीकडे जावून तालुक्याच्या इतिहासात प्रथमच २७ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचितांची कार्यशाळा व मार्गदर्शन शिबीर घेतल्याने गल्ली ते दिल्ली पर्यंत विकास कामे करण्याची स्पर्धा लागेल असे चिञ विवेक कोल्हे यांनी  गावा पासुन निर्माण केले आहे. 

श्रीकृष्ण व  छञपती शिवाजी महाराजांनी कधीच जीआर पाळला नाही जे करायचे ते धाडसाने केले. पण जे-जे केले ते-ते समाज हितासाठी केले. त्यांची भावना कधीच वाईट नव्हती म्हणुन त्यांना समाजाने उच्चस्थानी ठेवले. नियमाप्रमाणे काम करा त्यामुळे न होणारे कामे होतात. गावाच्या कल्याणासाठी सरपंचाने प्रामाणिक काम केले पाहीजे. पंढरपुरच्या पांडुरंगापेक्षा सरपंचाचा दर्जा मोठा आहे. देव कुठे नसतो तर देव गावाकऱ्यांच्या सेवेतच असतो. समाजासाठी जे जगतात तेच समाजाच्या आठवणीत राहतात. निवडणुकीत लढाई हा शब्द यापुढे बंद झाला पाहीजे केवळ निवड हा शब्द वापरावा. गावांची प्रगती म्हणजे देशाची प्रगती असे सांगुन पेरे यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

  यावेळी विवेक कोल्हे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक गालाचा विकास झपाट्याने झाला पाहीजे यासाठी नवी कार्यप्रणाली गावपातळीवर कशी राबता येईल, अद्यावत गावे कसे करता येतील याचा विचार मनात ठेवून भास्करराव पेरे यांच्या प्रमाणे मतदार संघातील सरपंच सदस्यांनी काम करावे. योजना कितीही आल्या तरी योजनांची योग्य अंमलबजावणी होत नाही म्हणूनच नवनिर्वाचितांची कार्यशाळा घेवुन मार्गदर्शन करावे लागले.

पंचसुञी कार्यक्रम राबवून गावांची दशा बदलावी. गाव कायम स्वच्छ ठेवावे, स्वच्छ पाणी द्यावे, शेत शिवारात फळांच्या वृक्षांची लागवड केली पाहीजे, गावातील वृध्दांना ग्रामपंचायतने दत्तक घेवून त्यांचा सांभाळ केला तर देशात भिकारीच दिसणार नाहीत. गावांची प्रगती गतीमान होईल. – भास्करराव पेरे

यापुढे तालुक्याचा विकास गतिमान करण्यासाठी आपण विषेश प्रयत्न करीत आहोत. ग्रामीण भागातील मुलभुत प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी विक्रमी निधी आणुन विकासाला चालना दिली. महीला कुठेही कमी नाही हे  स्नेहलता कोल्हे यांनी महीला मंडळ ते विधीमंडळ कृतीतुन सिध्द केले आहे, असे म्हणत गाव कारभाऱ्यांना विवेक कोल्हे यांनी विकास कामाचे नवे तंञ आणि मंञ पेरे यांच्याकडू दिल्या बद्दल समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाला कोल्हे कारखान्याचे संचालक मनेष गिडे, सतिश आव्हाड, ज्ञानेश्वर परजणे, प्रदिप नवले, निवृत्ती बनकर, अतुल काले, योगेश बागुल, दत्ता काले, दिपक गायकवाड,  अरुण येवले, सुनिल देवकर, केशवराव भवर, विक्रम पाचोरे, शिवाजी वक्ते, विलास माळी यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.