तालुकास्तरीय सांस्कृतिक व विविध गुणदर्शन स्पर्धेत भास्कर वस्ती शाळेचे यश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : नुकत्याच कोपरगाव तालुका शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा साकरवाडी येथे तालुकास्तरीय सांस्कृतिक व विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती यांनी एकूण बक्षीस पैकी चार बक्षीस मिळवले आहेत.

किलबिल गट हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक श्लोक रोहम, वैयक्तिक गीत गायन किलबिल गट प्रथम क्रमांक वैष्णवी जाधव, बालगट प्रथम क्रमांक वैयक्तिक गीत गायन अद्वैत भास्कर आणि वेशभूषा मध्ये बालगटात दुर्वा हर्षल आहेर यांनी प्रथम नंबर पटकवला केला आहे.

कोपरगावचे प्रतिनिधी म्हणून ते जिल्हास्तरावर कोपरगावचे नेतृत्व करणार आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे व शिक्षकवृंद यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.