शेवगाव सायकल क्लबच्या आठ सदस्यांना SR होण्याचा बहुमान

शेवगाव प्रतिनिधी, दि.१० : शेवगाव सायकल क्लब” च्या आठ सदस्यांनी सायकलिंग क्षेत्रातील अग्र मानांकित समजला जाणारा ‘ SR ‘ (Super Randonneur, ) पुरस्कार पटकावला आहे. या क्लबच्या सदस्यांनी प्रथम २००कि.मी., ३०० कि.मी, ४००की.मी., ६००की.मी. असे पंधराशे की.मी. BRM चे आव्हान पूर्ण करून हा सन्मान मिळवला आहे, शेवगावकारासाठी हा एक अभिमानाचा विषय आहे. या माध्यमातून  शेवगाव तालुक्याचे नाव सर्वदूर पोहचले आहे.

शेवगाव मध्ये प्रथम SR होण्याचा मान सचिन मुळे यांनी व  “शेवगाव सायकल क्लब” चे प्रेरणास्थान अमरावतीचे तहसीलदार तथा शेवगावचे भूमिपूत्र संतोष काकडे यांनी मागील वर्षी SR होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यांच्या प्रेरणेमुळेच या वर्षी शेवगाव सायकल क्लबच्या आठ सदस्यांनी एकाच वेळी SR होण्याचा बहुमान हासिल केला आहे.

      शेवगाव सायकल क्लबचे सायकलपटू डॉ. प्रदीप उगले, डॉ. स्मिता उगले, डॉ.मुकुंद दारकुंडे, बंडू दहातोंडे, पो.हे.को.संजय बडे, निळकंठ लबडे, आबासाहेब नेमाने, पवार यांनी SR हा बहुमान मिळविला असून oBRM स्पर्धेमध्ये डॉ.संदीप बोडखे-२०o, ३००व ४०० की.मी. डॉ.श्रीकांत देवढे,डॉ.जगदीश कुलकरर्णी, प्रा. राम नेव्हल, वसंत सुरवसे, विनोद ठाणगे यांनी २००व३०० कि मी, डॉ शिल्पा देहाडराय यांनी ३०० कि मी . तर डॉ.दीपक वैद्य- व डॉ.निखिल काकडे यांनी २०० कि मी चे लक्ष आत्तापर्यंत पूर्ण केले आहे.

     या यशासाठी शेवगाव सायकल कल्बचे अध्यक्ष विनोद ठाणगे, सदस्य हरिश शिंदे, निलेश केवळ, सुनील गवळी, कैलास जाधव डॉ.संजय लड्डा, डॉ.मनिषा लड्डा,प्रा.गजानन लोंढे, लक्ष्मण बिटाळ, भारत दहिवाळकर, शिवाजी बेंद्रे, पप्पू दहिवाळकर, नितीन पवार, सुरेश क्षिरसागर, नानासाहेब देशपांडे, वल्लभ लोहिया, संतोष भागवत, प्रशात सुपेकर, भागिनाथ काटे, दुर्गेश काथवटे, यशवंत तुपे सर्व सदस्यांचे योगदान कामी आले.