संडे हो या मंडे आपल्या सेवेत सदा लोखंडे – मुख्यमंत्री शिंदे

शरद पवार व उबाठासह विरोधकांवर जोरदार टीका

श्रीरामपूर प्रतिनिधी, दि. ८: शहराच्या नावातच श्रीराम आहे, येथील रहिवाशी आयोध्या मंदिराचे ट्रस्टी गोविंदगिरी महाराज यांच्या हताने पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी उपवास सोडला होता असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीरामपूरकरांना भावनिक साद घातली. संडे हो या मंडे आपल्या सेवेत सदा लोखंडे असे म्हणत मुख्यमंत्र्यानी महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे हे साधा भोळा माणूस असल्याचे सांगितले. जय श्री रामची घोषणा दिल्यावर काहींना रावनाच्या सेने सारखा राग येत येतो. लोकांच्या अहंकाराचे दहन केले पाहिजे अशी टीका शिंदे यांनी केली.

आपल्या एक तासाच्या भाषणात त्यांनी हिंदूत्व, काश्मिरचे ३७० कलम, मुंबईतील ह्लला, दहशतवाद, मोदी सरकारच्या विविध योजना, मराठा आरक्षण, तीन तलाक, राहुल गांधीचे अयशस्वी लॉचींग, दोन्ही सरकारची तुलना, आदिवासी कल्याण अशा विविध विषयांना हात घातला. घशाचा त्रास असतानाही त्यांनी एक तासा पेक्षा जास्त केलेले भाषण आजच्या चर्चेचा विषय ठरले. ते महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने बोलत होते.

       या प्रचार सभेच्या निमित्ताने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नामदार दादा भुसे, दीपक केसरकर, शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, राजू वाघमारे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, स्नेहलताताई कोल्हे, विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन औताडे, बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार, विठ्ठल घोरपडे, कपील पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.

ज्या प्रकारे साईबाबांना कशाचाही मोह नव्हता, ते फकीर होते तसा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कशाचाही मोह नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदीं साईबाबांचे भक्त आहेत, ते श्रद्धा व सबुरीचा संदेश मानत असले तरी ते जशास तसे उत्तर देखील देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत बोलतो व जग हालतो अशी सध्या भारताची स्थिती आहे.

पुलवामाचा बदला हा बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राईकने घेणारे पंतप्रधान असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या इंडी आघाडी पाकिस्तानची भाषा बोलत असून मुंबई हल्ल्यातील शहिदांचा अपमान करत असल्याची टीका त्यांनी केली. असे सांगत त्यांनी ही गल्लीतील निवडणूक नसून देशाच्या प्रगतीची व विकासाची दिशा ठरवणारी निवडणुक असल्याचे त्यांनी सांगितले.

       राम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशा आघाडीवर देशाचा विकास सुरू आहे. देशाची सुरक्षा, रोजगारासारख्या कोणत्याच प्रश्नाचा विरोधकांकडे अजेंडा नसून त्यांचा पंतप्रधान द्वेष हा एवढाच अजेंडा असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चंद्रयानचे यशस्वी लॉचींग झाले पंरतु गेली वीस वर्षापासून राहुल गांधी यांचे लॉचींग झाले नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यानी आपल्या भाषणात लगावला.

       उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्वार्थासाठी हिंदू ह्दय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली दिली. १०१९ ला ज्या भाजप बरोबर आघाडी करून लढले त्या भाजपच्या पाठीत खंजीर खुपासला त्यांनी गद्दारीची भाषा करणे योग्य नाही असे सांगत ते अडीच वर्षाचे सरकार हे फेसबुक सरकार असल्याचेही टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्या अडीच वर्षाच्या सरकारची तुलना आमच्या सरकारची होऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

       इंडी आघाडीचे नेते शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेस आघाडीत समाविष्ट करण्याची भाषा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच आपला पक्ष काँग्रेसमध्ये समाविष्ट केला आहे. आता शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये समाविष्ट करणार असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षण दिले त्यामुळे शब्द पाळणारा मुख्यमंत्री असल्याचेही त्यांनी सांगितले. आदिवासी महिलेला राष्ट्रपती करून आदिवासी समाजाचा सन्मान केला असल्याचेही त्यांनी सांगितले. देशभक्त मुस्लिमांचा आम्ही सन्मान करतो, म्हणूनच आमच्या मंत्री मंडळात अब्दुल सत्तार सारखा मुसलमान आमच्या मंत्री मंडळात समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.