‘आठवणीतील शेवगाव’ ग्रंथाचा दि. १८ मे प्रकाशन सोहळा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ :  ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका डॉ. मेधाताई कांबळे लिखित  ‘आठवणीतील शेवगाव ‘ या  ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक १८ मे रोजी सकाळी साडे दहाला संपन्न होत आहे.       

येथील मिरी मार्गे नगर रस्त्यावरील ममता लॉन्स मध्ये हा शानदार सोहळा तालुक्याचे भूमिपुत्र, सेवानिवृत्त आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते व प्रसिद्ध साहित्यिक, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष  प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे अध्यक्षतेखाली तसेच शेकडो निराधार मनोरुग्णांना आधार देऊन सांभाळ करणाऱ्या, देहरे येथील माऊली प्रतिष्ठानचे प्रवर्तक  डॉ. राजेंद्र धामणे व  प्रसिद्ध साहित्यिक कैलास दौंड आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न होत आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहावे. असे आवाहन सोहळ्याचे संयोजक असिस्टंट कमांडंट नरेंद्र गच्ची यांनी केले आहे.