कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : वार्षिक स्नेहसंमेलनाने मुलाच्या कलागुणाना वाव मिळतो. असे मत मधुकर साबळे यांनी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले. यावेळी मंचावर सरपंच सुलोचना ढेपले, माजी केंद्रप्रमुख दिलीप ढेपले, आयोद्योगिक वसाहत मा. संचालक पंडित भारुड, लक्ष्मण साबळे, माजी सरपंच चंद्रकांत लोखंडे, स्थानिक व्यवस्थापन कमेटीचे अनिल भोसले, विशाल सांगळे, बाळासाहेब बारहाते, बाळासाहेब खर्डे, सचिन काळे, तुषार ससाणे, बाबुराव मैंद, विजय आगवन आदी मान्यवर उपस्थित होते.
साबळे पुढे म्हणाले कि, ग्रामीण भागातून चांगले कलाकार व खेळाडू निर्माण होऊ शकतात. त्याचे उदारण म्हणजे जयश खरे, कोपरगावची गौरी पगारे होय. संधी मिळत नाहि. परंतु मिळाली तर संधिचे सोने विद्यार्थ्यानी केले पाहिजे. म्हणून आज शाळेने आपणास चांगली संधी निर्माण करून दिली आहे. त्याचा फायदा सर्वानी घ्यावा असे आवाहन साबळे यांनी विद्यार्थ्याना केले. विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये दैनदिन व्यवहाराचा अनुभव मिळावा म्हणून बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला.
तसेच दुपारी ठीक३.०० वा.विद्यालयात विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, मला लागली कुणाची गुचकी, ललाटी भांडार, देवी आईला साकडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लढले जनतेसाठी, कुंकू लावले रमान, देखो देखो, आमचीच हवा असे विविध गीताबरोबरच देशभक्ती गीत, लावणी, प्रबोधनपर नाटके, वैयक्तिक गाणी सादर करण्यात आले.
यावेळी अनेक मान्यवरांनी उत्कृस्ट कार्यक्रम सादरीकरण केल्याबद्दल रोख रक्कम बक्षीसे देण्यात आले असून पालक ग्रामस्थानी या वेळी विद्यार्थ्याचे कौतुक केले. पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक, पालकमोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक मोरे आर.एस, पर्यवेक्षक शरद आंबिलवादे सर, सर्व सेवक बंधू-भगिनी उपस्थित होते.
यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख टावरे एल.ए. व सहाय्यक म्हस्के मॅडम, साळुंके मॅडम, सोळसे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी सर्व वर्गशिक्षक व सेवकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल विभाग प्रमुख खताडे जे.व्ही. यांनी केले व आभार आंबिलवादे सर, यांनी मांडले. या वेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.