कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : महिला व बचत हे समीकरण वेगळे नाही. महिलांना बचत करण्याची सवय असते. बचत ही त्यांना मिळालेली ईश्वरी देणगीच आहे. जमलेल्या बचतीतून पुढे स्वयं रोजगार, उद्योग व्यवसाय उभे करण्यास मदत होते. यासाठी महिला बचत गटांचा उपयोग सध्या होत आहे. महिला बचत गटाच्या जननी ईला भट यांनी सुरत येथील मिल मजदुरी करणाऱ्या महिलांना एकत्र करून (Sewa) सेवा ही संस्था स्थापन केली. तेव्हापासून बचत गटाच्या चळवळीला प्रारंभ झाला.
आज बचत गटाच्या माध्यमातून देशात बारा कोटी महिला जोडल्या गेल्या आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी मोठमोठे उद्योग व्यवसाय सुरू झालेले आहेत. बचत गट चळवळीच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण झालेले असून मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्माण झालेला आहे. आपल्याही परिसरात बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मोठा उद्योग उभा करावा अशी अपेक्षा व्यक्त करत या कामी लागणारे सहकार्य, मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नितीनराव औताडे यांनी दिले.
ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती कोपरगाव अंतर्गत आनंदी महिला प्रभाग संघ देर्डे चांदवड–चांदेकसारे प्रभाग संघाची वार्षिक सर्व साधारणसभेत बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते. आनंदी महिला प्रभाग संघ चांदेकसारेच्या अध्यक्षा अनिता खालकर याचे अध्यक्षते ग्रामपंचायत मंगल कार्यालय, देर्डे रोड पोहेगाव येथे ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, इंडियन ओवरसीज बँकेचे शाखाधिकारी शेखर कोरडे, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी विशाल जाधव, अहमदनगर जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी लोहकणे, तालुका व्यवस्थापक मनिषा पाटील मॅडम, गणेश जाधव, कृषी संपदा कंपनी येवलाचे विठ्ठल वाळके, पोहेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच अलका जाधव, उपसरपंच अमोल औताडे, मढी ग्रामपंचायत सरपंच लीना आभाळे, देर्डे चांदवड ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा गायकवाड, जवळके ग्रामपंचायत सरपंच सारिका थोरात, वेस ग्रामपंचायत सरपंच जया माळी तसेच चांदेकसारे प्रभागतील ग्रामपंचायत सरपंच,
चांदेकसारे प्रभाग समन्वयक गणेश मेथे, वारी प्रभाग समन्वयक निवृत्ती दारवंटे, सुरेगाव प्रभाग समन्वयक अमोल शेळके, ब्राम्हणगाव प्रभाग समन्वयक जयपाल जाधव, शिंगणापूर प्रभाग समन्वयक अनिल पवार, पशु व्यवस्थापक आभाळे सर, कृषी व्यवस्थापक भाकरे मॅडम, गणेश जाधव, आनंदी महिला प्रभाग संघ चांदेकसारे अध्यक्ष अनिता खालकर यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच प्रभागातील महिला गटाच्या पदाधिकारी यांचे सह बचत गटाच्या २५०० महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक गणेश जाधव यांनी केले. सूत्रसंचालन दिपाली आभाळे व कावेरी जाधव यांनी केले तर आभार सोनाली नेहे यांनी मानले.