के . बी . रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : पुणे विभागीय  माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी/ मार्च 2024 मध्ये घेतलेल्या इ.12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून  कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी  बोर्ड परीक्षेचा निकाल उत्कृष्ट  लागला आहे. 

     महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. विज्ञान शाखेत गाढे  आर्यन नितीन  73.17टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे. बारे आदित्य योगेश 72.33 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.याने गणित विषयात 96गुण मिळवले. कुमारी चांदगुडे श्रावणी सुनील 70.67 टक्के गुण मिळवून  तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

 वाणिज्य शाखेत वाघ गोकर्ण राजेंद्र 76.67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.  कुमारी वाघ रेणुका रवींद्र हिने 76.17 द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच कुमारी   शिंदे अश्विनी संतोष 75.17 टक्के गुण मिळवून  तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, संदीपराव रोहमारे, सुजितराव रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव,सचिन चांदगुडे, मनेष गाडे  पंडितराव चांदगुडे डॉ. विकास जामदार, रामभाऊ गाढे. चासनळी  महाविद्यालयाचे प्राचार्य. बारे एन. जी.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.